जावयाच्या अंत्यविधीला आलेला सासरा बेपत्ता, चौथ्या दिवशी आढळला मृतदेह

गडचिरोली जिल्हा
Unique Multiservice
Share

गड़चिरोली जावयाच्या अंत्यविधीला आलेला सासरा अचानक बेपत्ता झाला, चार दिवसांनी गावालगत त्याचा मृतदेह आढळून आला. २ जानेवारीला जेवलवाही येथे ही घटना उघडकीस आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सासऱ्याच्या गळ्याभोवती गमछा गुंडाळलेला आढळला, त्यामुळे गळा आवळून हत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.

जनू घिसू पोरेट्टी (८४,रा. जेवलवाही ता.धानोरा) असे मयताचे नाव आहे. जनू पोरेट्टी यांना एकुलती एक मुलगी असून ती परसवाडी येथे राहते. जनू हे पुतण्याकडे गावी असायचे. २७ डिसेंबरला जावयाचे निधन झाल्याचे कळाल्यावर जनू पोरेट्टी हे नातेवाईकांसोबत जेवलवाहीला पोहोचले. २८ डिसेंबर रोजी अंत्यविधी होण्यापूर्वीच जनू पाेरेट्टी गायब झाले. अंत्यविधी उरकल्यावर त्यांचा शोध घेतला असता ते कोठेही मिळून आले नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी धानोरा पोलिस ठाण गाठून ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दरम्यान, २ जानेवारी रोजी जेवलवाही गावापसासून जवळ एका शेतालगत त्यांचा मृतदेह शेतीकाम करण्यासाठी गेलेल्या मजुरांना आढळून आला. त्यांच्यात गळ्यातील गमछा गळ्याला गुंडाळलेला असल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन त्यांचा गळा आवळून खून केल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धानोरा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या घटनेने खळबळ उडाली असून अधिक तपास सुरु असल्याचे पो.नि. गौरव गावंडे यांनी सांगितले.

लेकीवर दुहेरी आघातदरम्यान, जनू पोरेट्टी यांच्या मुलीवर या घटनेने दुहेरी आघात झाला आहे. पतीच्या निधनाने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाच बेपत्ता वडिलांचा मृतदेह आढळून आला. चार दिवसांच्या फरकाने पतीपाठोपाठ वडीलही गेल्याची बातमी कळाल्यावर तिने एकच आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांनाही गहिवरुन आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत