देशात सर्वत्र सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून ओटीपी द्वारे नागरिकांच्या खात्यातील पैसे परस्पर काढून घेणे, महिलांचे अश्लील फोटो व व्हिडिओ प्रसारित करणे, फेसबुक खाते हॅक करून संबंधितांच्या नावाने पैशांची मागणी करणे यासह आधुनिक काळात आभासी विद्वत्तेच्या आधारे (Artificial Intelligence) थेट एखाद्या व्यक्तीच्या आवाजात फोन करून पैशांची मागणी करणे अथवा एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ मॉर्फ करून अश्लील चित्रफिती बनवणे नित्याचेच झाले आहे. newsjagar
अशाच सायबर गुन्हेगारांचे मनोबल फारच वाढले असुन त्यांनी चक्क चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी ह्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले असुन ह्याद्वारे हे गुन्हेगार अधिक गंभीर गुन्हे देखिल घडवून आणू शकतात किंवा अपराध्यांना बेकायदा संरक्षण देण्याकरिता पोलीस अधीक्षकांच्या बनावट फेसबुक खात्याचा वापर करू शकतात. प्राप्त माहितीनुसार हे गुन्हेगार थेट पोलिस अधीक्षकांच्या नावाने असलेल्या बनावट खात्यावरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात येत आहे. पोलीस अधिक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी सदर अकाउंट वरून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट नागरिकांनी न स्वीकारण्याचे आव्हानही केले आहे .