
बल्लारपुर शहरातच नाही तर तालुक्यामध्ये आणी चंद्रपुर जिल्हयात अवैध दारु विक्रेता ला पोलीस विभाग आणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मोठे समर्थन
चंद्रपुर जिल्हयात अवैध दारु व्यवसाय बल्लारपुर तालुक्यातच नसुन पोंभुर्णा तालुक्यातील चेक खापरी गावात देखील मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री सुरु असल्याचे गावातील महिलांनी अवैध दारु व्यवसाय कायमचा बंद करण्यात NP वुमेन एण्ड चाईल्ड सेक्युरिटी वेलफेअर फाउंडेशन कडे मदत मागीतली. बल्लारपुर शहरात जवळपास अंशी लोक अवैध दारु विक्री करत आहेत त्यापैकी २० ते २५ लोकांची मोठ मोठे अवैध देशी विदेशी दारुभट्टी असल्याचे पुराव्यासहित राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस विभाग चंद्रपूर यांना पुराव्यासहित सांगीतले परंतु आजपर्यत प्रशासनाने अवैध दारु विक्रेता चे दुकानावर कुलुप लावले नसल्याचा आरोप प्रियाताई झांबरे यांनी केला आहे.
प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडुन दरमाह वेतन मिळतो परंतु स्वतःहा निष्काळजीपणे काम करतात आणी २००/- रुपये मजूरी करणाऱ्या महिलांना म्हणतात की अवैध दारु विक्रेताची माहिती द्या. लाखो रुपयाचे वेतन उचलणारा वर्दीतला माणुस अवैध दारु विक्रेता कडुन वसुली करतो आणी खुर्चीवर बसुन वर्दीचा रुबाब दाखवितो आणी सर्व साधारण मजुरदारांना म्हणतो की अवैध दारु विक्रेता कडे लक्ष द्या ही फार मोठी शोकांतीका आहे.
बल्लारपुर शहरात नवीन ठाणेदार गव्हाणे कर्तव्यदक्ष असतांना देखील बल्लारपुर, बामणी कळमणा मध्ये अवैध दारु विक्री सुरुआहे, त्यांनी या कडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. News Jagar
पोंभुर्णा तालुक्यात सुद्धा चेक खापरी गावात प्रविण मडावी, दशरथ मडावी व इतर यांची दारु विक्री सुरु असून , त्याकडे सुद्धा पोंभुर्णा पोलिसांचे दुर्लक्ष आहे.
चंद्रपुर जिल्हयात वैध/अवैध दारु व्यवसायावर नियंत्रण ठेवणारे विभाग म्हणजेच एक्साईज विभाग, पोलीस विभाग आहे. या दोन्ही विभागाचा अवैध दारु व्यवसाय करणाऱ्यांकडुन लाखो रुपयाचा फायदा असल्याची चर्चा नेहमीच असते , चंद्रपुर जिल्हयात अवैध व्यवसायाला आळा घालण्याचा फक्त दिखावा केला जातो असा आरोप हि त्यांनी केला आहे .
अवैध दारु दुकानात नकली दारु विकल्या जाते. अल्पवयीन मुलं दारुच्या आहारी जात आहेत. महिलांचे त्रास वाढले आहेत, पोंभुर्णा व बल्लारपुर शहरात तात्काळ अवैध दारु व्यवसाय बंद करण्यात आले नाही तर नागपुर आणी मुंबई चे वरिष्ठ कार्यालय गाठण्याचे काम पिढीत महिला करतील अशी माहिती NP वुमेन एण्ड चाईल्ड सेक्युरिटी वेलफेअर फाउंडेशन च्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षा प्रियाताई झांबरे यांनी सांगीतले