बल्लारपुर तहसील कार्यालयाचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे जनतेच्या तक्रारी व पत्राकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष-प्रियाताई झांबरे

BREAKING NEWS चंद्रपूर जिल्हा
Unique Multiservice
Share

चंद्रपुर ते बल्लारपुर तहसील कार्यालयात अप डाउन करणाऱ्यां कर्मचाऱ्यांना नियम मोडण्याकरिता वरिष्ठांची साथ असल्याने कर्मचाऱ्यांची कार्यालय सुरु मनमानी

सहा नोव्हेबंर २०२४ रोजीचे तहसील कार्यालयातील मेल द्वारे दिलेली तक्रार अजुनही आस्थापना डेक्सवर प्रलंबित…बेशिस्त आणी बेजबाबदार पणे तसेच कर्तव्यात कसुर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी आणी विभागीय आयुक्तांनी दखल घेण्याची मागणी.

मागील अनेक वर्षापासुन बल्लारपुर तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांची मनमानी पणा सुरु आहे. एखाद्या विषयावर तक्रार केली तर बल्लारपुर तहसील कार्यालयाचे अधिकारी तक्रारीवर दखल घेत नाही. संबधित टेबलवर तक्रार अर्ज धुळ खात असतात पण त्याकडे संबधीत कर्मचारी किंवा अधिकारी यांचे लक्ष नसते. शासनानी ठरवीलेल्या कालावधित तक्रार अर्जाचे उत्तर दिल्या जात नाही तर शासनाच्या तिजोरी ला फटका बसण्यापेक्षा अशा बेजबाबदार कर्मचारी अधिकाऱ्यांना पदमुक्त करुन त्यांना घराचा रस्ता दाखवायला पाहिजे असे सामाजिक कार्यकर्ता प्रियाताई झांबरे यांचे म्हणने आहे.

माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्रथम अपील चे आदेश पारीत होऊन देखील अद्याप तहसील कार्यालय बल्लारपुर चे सहा. जन माहिती अधिकारी माहिती देण्यास दिरंगाई करीत आहे. एका वर्षापेक्षा कालावधी लोटुन गेला परंतु अद्याप एकाही तक्रार अर्जावर, विनंती अर्जावर दखल घेतल्या जात नसेल तर तहसील कार्यालयाची गरज काय असा प्रश्न जनतेच्या मनात उध्दभवत आहे. बल्लारपुर महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.

बल्लारपुर तहसील कार्यालयात शासनानी कर्मचाऱ्यांची नियुक्ति केली परंतु बल्लारपुर तहसील कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांच्या हाताखाली खाजकी कर्मचारी ठेवुन देखील जनतेच्या कामाकडे दुर्लक्ष ही फार मोठी शोकांतीका आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात मौजमस्ती करायला वेळ मिळतो परंतु तक्रार अर्जाकडे मात्र दुर्लक्ष यावर जिल्हाधिकारी साहेब तसेच आयुक्त नागपुर या गैरजिम्मेदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करतील अशी मागणी आदर्श मिडीया एसोसिएशन च्या महाराष्ट्र अध्यक्षा प्रियाताई झांबरे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत