जबाबदार अधिकाऱ्यांची शासकीय कार्यालयात मौजमस्ती

महत्वाची बातमी महाराष्ट्र
Unique Multiservice
Share

बल्लारपुर तहसील कार्यालयातील प्रभारी तहसीलदार कोकाटे आणी तहसील कार्यालय आणी उपविभागीय अधिकारी कार्यालय च्या कर्मचाऱ्यांनी मिळुन केली शासनानी काढलेल्या नियमावली ची पायमल्ली

चक्क तालुका दंडाधिकारी यांच्या बेंच वर केक कटिंग करत शासकीय जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांची मौजमस्ती आणी जनतेच्या अर्जाकडे दुर्लक्ष याकडे जिल्हाधिकारी चंद्रपुर आणी विभागीय आयुक्त नागपुर कारवाई करतील काय जनतेच्या मनात उद्दभवलेले प्रश्न

 

सुत्राच्या माहितीनुसार प्राप्त झालेली घटना , दिनांक 01/01/2025 रोजी तहसील कार्यालय बल्लारपूर येथील माननीय उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांचे या कार्यालयात मागील काही महिन्यापासून पद रिक्त आहे. तसेच तहसील कार्यालयाचे कार्यरत असलेले तहसीलदार हे पाच दिवसाच्या रजेवर असल्यामुळे त्याबाबतचा संबंधित कार्यभार हे कोठारी सर्कलच्या अप्पर तहसीलदार कोकाटे यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून, तहसीलदार यांच्या कक्षा मध्येच नव्हे तर तालुका दंडाधिकारी यांचे बेंचवर नवीन वर्षाची पार्टी साजरी करण्यात आली. शासकीय कार्यालयात अधिकारी तसेच कर्मचारी हे जनतेचे कामे करण्याकरिता येतात की पार्टी करण्याकरिता येतात याची शहानिशा जिल्हास्तरावरच नाही तर शासन स्तरावर करायला पाहिजे. बल्लारपुर तहसील कार्यालयातील कर्मचारी हे जनतेच्या अर्जावर वेळेच्या आत दखल घेत नाही परंतु शासकीय कार्यालयात मौजमस्ती, पार्टी साजरी करायला वेळ आहे. निवडनुक च्या अगोदर पासुन तक्रार अर्ज, माहिती अर्ज पेंडींग आहेत त्याकडे अधिकारी यांचे सक्तीने लक्ष नाही परंतु शासनाच्या नियमाला धाब्यावर ठेऊन पार्टी केली जाते, एक नाही तर दोन केक कापुन आॅनड्युटी नवीन वर्ष साजरा केला जातो.

तालुका दंडाधिकारी यांच्या पदाचा गरिमा न ठेवता प्रभारी तहसीलदार कोकाटे आणी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या नियमाची पायपल्ली केली. तरी या सर्व घटनेकडे तसेच अधिकाऱ्यांनी आणी कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकांकडे जिल्हाधिकारी चंद्रपुर आणी विभागीय आयुक्त नागपुर यांचे लक्ष केंद्रीत होणार काय ?? असा प्रश्न जनतेच्या मनात उध्दभवत आहे. सर्व सामान्य नागरीक शासकीय कार्यालयात मोठ्या आशेनी येतात की त्यांना न्याय मिळेल परंतु वर्षोनुवर्ष जनतेचे कामे रेंगाळत राहतात आणी अधिकारी कर्मचारी जोमात,, हर्षउल्हासात असतात… शासनाकडुन जो वेतन प्राप्त होतो तो पार्टी करण्याकरीता की काम करण्याकरीता, शासन नियमावलीत दर्शविले आहे की,, शासकीय कार्यालयात थोर महापुरुषांच्या जयंत्या किंवा शासकीय कार्यक्रमा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे अन्य कार्यक्रम,, पार्टी करने किंवा धार्मीक फोटो लावने म्हणजेच नियमाचे उल्लंघन आहे. वरिष्ठांच्या कार्यालयात विचारना केली असता कोठेही केक कटिंग करुन पार्टी करण्यात आले नाही. मग बल्लारपुर तहसील कार्यालयात मनमानी सुरु आहे काय ??

बल्लारपुर तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या निंदनीय घटनेकडे आपले लक्ष केंद्रीत करुन विभागीय आयुक्त नागपुर तसेच जिल्हाधिकारी साहेब चंद्रपुर यांनी फोटो व्हिडीओ मध्ये पार्टी करतांना दिसणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचेवर कारवाई करने अनिवार्य आहे.

गेल्या काही वर्षांपासून तहसील ऑफसमध्ये लोकांचं कामे होत नसून , लोकांच्या कामाप्रती अधिकाऱ्यांना उदासीनता दिसून येत आहे , यावर वरिष्ठ अधीकारी लक्ष देणार काय ? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या प्रिया झांबरे यांनी केला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत