ब्रम्हपुरी शहरात पोलीसांनी २८ डिसेंबर ला रात्री १० वाजताच्या सुमारास अटक केले. ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथक शहरात पेट्रोलींग करीत असतांना तीन ईसम लुंबीनी नगर मधील अशोक भैया लेआउट ब्रम्हपुरी यांचे प्लॉटच्या मोकळ्या जागेवरील रोडवर सार्वजनिक ठिकाणी गांजासारखा अंमली पदार्थ जाळुन सेवन करुन नशा करीत असतांना किरण उर्फ प्रफुल अशोक अंडेलकर (३२) रा. रेणुकामाता चौक, गुजरी वार्ड, आकाश प्रकाश मेश्राम (२४) रा. सम्राट अशोक चौक भवानी वार्ड , समिर उर्फ संबट सुनिल धोटे (१८) रा.जानी वार्ड , सर्व रा . ब्रम्हपुरी यांना अटक केले. ते तिघे जण चिलम मध्ये गांजा टाकुन, चिलम पेटवून ती आळीपाढीने ओढत होते.
ब्रम्हपुरी पोलीसांनी त्यांच्या गुन्हा नोंदविला प्रमाणे आहे. सदर कारवाई ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, नापोकॉ मुकेश गजबे, पो.अं. अनुप दिघोरे, पो. अं निलेश तुमसरे यांनी केले.