देशाचे गृहमंत्री अमित शहा याचे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा बद्दल संसदेत अवमान जनक वक्त्यव्य, तसेच परभणी जिल्ह्यातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या हातातील संविधानाची अज्ञातांनी तोडफोड केल्यावर आंबेडकरी अनुयायांनी निषेध नोंदविला आणि निषेधार्थ बाजारपेठ बंद करण्यात आली. पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून बौद्ध वस्त्यांवरील भीमसैनिकांना बेदम मारहाण केली. सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या भीमसैनिकावर खोटे गुन्हे दाखल करून त्याला न्यायालयीन कोठडीत मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. News Jagar
दिवसेंदिवस बौद्ध समाजावर होत असलेला अन्याय व अमित शहासारख्या विचारसरणीच्या लोकांकडून ज्या पद्धतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरले जात आहेत यामुळे आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड रोष व्यक्त केल्या जात आहे. या घटनेचा जाहीर निषेध व विरोध करण्यासाठी मूल तालुक्यातील व शहरातील बौद्ध समाज बांधव यांच्याद्वारे दिनांक २४/१२/२०२४ ला सकाळी दहा वाजता ताडाळा रोड वरील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बौद्ध समाज बांधवांचा तहसील कचेरीवर भव्य विराट मोर्चा निघणार आहे. सदर मोर्चाला जास्तीत जास्त बौद्ध समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध समाज बांधवांनी केले आहे. newsjagar