जुन्या तहसील कार्यालयामागील गोवर्धन यांच्या घरची घटना
चामोर्शी :- येथील जुन्या तहसील कार्यालया मागील नवजीवन नर्सिंग कॉलेज च्या संचालक मृणाल भिमराव गोवर्धन यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ६५ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २१ डिसेंबरच्या च्या रात्री चामोर्शी पोलिस स्टेशन अंतर्गत घडली
मिळालेल्या माहितीनुसार जुन्या तहसील कार्यालया मागील नवजीवन नर्सिंग कॉलेज च्या संचालक मृणाल भिमराव गोवर्धन यांच्या रहाते घरी अज्ञात चोरट्याने दरवाजाचां कुलूप तोडून घरात प्रवेश केला व आलमारी मधील ऐक सोन्याची अंगठी, जूने, नवे चांदीचे चार जोड असा ऐकून ६५ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २१ डिसेंबरच्या रात्री १० ते सकाळी सहा च्या सुमारास घडली आज सकाळी घटनेची माहिती चामोर्शी पोलिसांना मिळताच घटना स्थळी दाखल होत घटना स्थळाचा पंचनामा केला असून अज्ञाता विरोधात गुन्हा नोंदवत पुढील तपास पोलिस निरीक्षक अमुल कादबाने यांच्या मार्गदर्शनात पो ह जंगी हे करीत आहेत.