वार्तापत्र
दिनांक :- 15/12/2024
गडचिरोली पोलीसांनी उधळुन लावला माओवाद्यांचा घातपात करण्याचा डा
श्व् गडचिरोली पोलीस दलाने माओवादयांचा स्फोटक साहित्यांचा साठा (डम्प) केला नष्ट
गडचिरोली जिल्हा हा माओवादाने प्रभावित जिल्हा असल्याने या ठिकाणी माओवादी हे विविध हिंसक कारवाया करुन सुरक्षा दलाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करीत असतात. काही महिन्यांपुर्वी माओवाद्यांनी पोमकें मरपल्ली अंतर्गत येणाया मौजा करंचा गावाच्या जंगल परिसरात काही स्फोटके साठा (डम्प) करुन ठेवली आहेत अशी विश्वसनिय गोपनिय माहिती आज सकाळी मिळाली होती.
त्यावरून आज दि. 15/12/2024 रोजी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या विश्वसनिय गोपनिय माहितीच्या आधारे सदर स्फोटकांच्या साठयाचा (डम्पचा) शोध घेऊन ते निकामी करणेकामी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा श्री. शशीकांत दसूरकर यांचे नेतृत्वात पोमकें मरपल्ली पोलीस पार्टी, व एसआरपीएफच्या एकत्रित पथकाने सदर जंगल परिसरात शोध अभियान सुरू केले. शोध अभियाना दरम्यान पथकांना करंचा गावाच्या जंगल परिसरात स्फोटक साहित्यांचा साठा (डम्प) मिळुन आला. त्यामध्ये एक प्लॅस्टीक ड्रममध्ये अंदाजे एक ते दोन किलो स्फोटकांनी भरलेली किटलीतील (IED) आयईडी, तीन वायर बंडल, एक बॅटरी, एक डेटोनेटर इ. स्फोटक साहित्य होते. सदर साठा (डम्प) संशयास्पद वाटल्याने साठा (डम्प) जप्त करणेकामी तात्काळ प्राणहिताहून एक (BDDS) बीडीडीएस पथक घटनास्थळी पाठविण्यात आले. स्फोटक साहित्यांनी भरलेली किटली त्याच स्थितीत घटनास्थळी नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट केली व तीन वायर बंडल, एक बॅटरी, एक डेटोनेटर इत्यादी साहित्य घटनास्थळावरुन जप्त करण्यात आले. व सुरक्षितरित्या पोमकें मरपल्ली येथे आणण्यात आले. या सर्व कार्यवाहीत सुरक्षा दलातील कोणत्याही जवानाला दुखापत झालेली नाही, तसेच सर्व पोलीस पथके पोमकें मरपल्ली येथे सुखरुप पोहचली. गडचिरोली पोलीसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा मोठा घातपात घडवुन आणण्याचा व सुरक्षा दलास नुकसान पोहचविण्याचा डाव हाणून पाडण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा श्री. शशीकांत दसूरकर यांचे नेतृत्वात (BDDS) बीडीडीएस प्राणहिता पथकाच्या स.फौ./922 बंडु आत्राम व जवानांकडून पार पाडण्यात आली.