ACCIDENT

दुचाकीने स्टंटबाजी करणे युवकांच्या जीवावर बेतले

BREAKING NEWS नागपुर महत्वाची बातमी महाराष्ट्र
Unique Multiservice
Share

उड्डाणपुलावर शर्यत खेळताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात दोन्ही युवकांचा मृत्यू झाला. ही घटना गुुरुवारी 5 /12/2024 ला पहाटेच्या सुमारास नरेंद्रनगरातील उड्डाणपुलावर घडली. आदर्श रमेश समर्थ Aadarsh Ramesh Samarth  (२४, जुना बाबुलखेडा, पार्वतीनगर) आणि आदित्य राकेश मेश्राम Aaditya Rakesh Meshram  (१८, किरणापूर, हुडकेश्वर) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. News Jagar

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जून विश्वकर्मा (१९, भगवाननगर), आदित्य मेश्राम आणि आदर्श समर्थ या तिघांनाही स्टंटबाजी करण्याची सवय होती . आदित्य आणि आदर्श दोघे पल्सर या दुचाकीने तर अर्जून हा अॅक्टीव्हाने गुरुवारी पहाटे दोन वाजता नरेंद्रनगर उड्डाणपुलावर स्टंटबाजी करण्यासाठी आले असता आदर्शने सुसाट वेगाने दुचाकी चालवून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उड्डाणपुलाच्या मधोमध त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी दुभाजकाला धडकली असता ते दुचाकीत फसून जवळपास २ ० ० मीटर घासत गेले परिणामतः त्यांच्या डोक्याला दुभाजकाचा मार लागला, त्यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल केले. दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळपर्यंत उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तासाभराच्या अंतराने दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.
एका इमारतीवरील सीसीटीव्हीमध्ये सदर स्टंटबाजी चा थरारक अपघात रेकॉर्ड झाला असून पोलिसांनी ते सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. newsjagar
प्रतापनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश भोले PSI SATISH BHOLE हे अधिक तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत