कामठी – मौदा विधानसभा मतदारसंघातील जयंती नगरी २, बेसा येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत कार्यकर्ते व नागरिकांशी कामठी – मौदा विधानसभा भाजपा चे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी संवाद साधला. या निवडणुकीत मतदान करताना स्थानिक प्रश्नांबरोबरच एकूण राज्याच्या विकासाबाबत विचार केला पाहिजे. जर या राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर न्यायचे असेल तर पुन्हा एकदा भाजपा – महायुती सरकार निवडून येणे ही काळाची गरज आहे.असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले , त्यासाठी येत्या 20 तारखेला जास्तीत जास्त संख्येने कमळ या चिन्हावर बटन दाबून भाजपा – महायुतीला भरघोस मतदान करण्याची विनंती त्यांनी उपस्थितांना केली, यावेळी जयंती नगरी २ येथील नागरिकांची भरपूर उपस्थिती होती. news jagar