♦ खुनासाठी घेतली मित्रांची मदत
महाविद्यालयात शिकत असतांना सचिन घरात SACHIN GHARAT (२६, रा.डोंगरताल, ता. रामटेक) व भारती नारनवरे BHARTI NARNAVARE(२२) यांच्यात प्रेम संबंध होते, शिक्षण पूर्ण होताच सचिन सैन्यात नौकरीला लागला त्यामुळे रजामंदीने २०२२ मध्ये लग्न लावून देण्यात आले, दोन वर्ष संसार सुरळीत सुरु असतांनाच मात्र सचिन चे भारतीच्या मैत्रिणींसोबतच प्रेम संबंध निर्माण झाले, त्याने प्रेयसी सोबत लग्नासाठी भारतीला घटस्फोटासाठी विचारणा केली असता भारतीने नकार दिला, भारती प्रेमसंबंधात अडसर ठरल्याचे लक्षात येताच भारतीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने सचिनने तिला घराबाहेर काढले, कारमध्ये आधीच मित्र भूनेश्वर गजबे BHUNESHVAR GAJBE(१९), राहुल चौके RAHUL CHAUKE (२२) आणि सैन्य दलातील सहकारी नरेंद्र दोडके NARENDRA DODKE हे तिघे होते. सचिनने मित्रांच्या मदतीने पत्नी भारतीचा गळा आवळून खून केला व मृतदेह मध्यप्रदेशातील बेडाघाट परिसरातून वाहणाऱ्या नर्मदा नदीत फेकून दिला.
भारतीचा खून करून काहीच झाले नाही अश्या अविर्भावात सचिन व नरेंद्र हे आपल्या कर्त्यव्यावर रुजू व्हायला निघाले ARMY MAN KILLED HIS WIFE FOR SECOND MARRIAGE
मुलगी भारती बेपत्ता असल्याची तक्रार आई निर्मला नारनवरे यांनी रामटेके पोलीस स्टेशन ला दिली असता ठाणेदार आसाराम शेटे PI AASARAM SHETE यांना भारतीच्या मोबाईलच्या तांत्रिक चौकशी द्वारे संशयितांची नावे समजली, भूनेश्वर गजबे (१९), राहुल चौके (२२) यांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्यांनी भारतीचा खून करून मृतदेह नदीत फेकल्याचे सांगितले. पोलिसांनी नदीतून मृतदेह बाहेर काढून ओळख पटवली. सैन्य दलात असलेला पती सचिन घरात आणि नरेंद्र दोडके यांना अटक करण्यासाठी पथक रवाना केले असल्याचे कळविले आहे. NEWS JAGAR