सलग सहा टर्मनंतर सुधीर मुनगंटीवार आता सातव्यांदा निवडणुकीसाठी बल्लारपूरमधून उभे आहेत, गेल्या 30 वर्षांत त्यांनी केलेल्या विकास कार्यामुळे लोक भारावून गेली आहेत, इतर पक्षातील मात्तबर नेतेमंडळी त्यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन पक्षात प्रवेश घेत असतांना आता तेलंगणातील भारत राष्ट्र समितीने श्री.सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे बीआरएस हा पक्ष महायुतीत नाही.
दिवसेंदिवस त्यांना जिल्ह्यातून व्यापक पाठिंबा मिळत आहे. पार्टीचे जिल्हाध्यक्ष वमशीक्रिष्णा अरकिल्ला यांनी पाठिंब्याचे पत्र सुधीर मुनगंटीवार यांना देत भाजपच्या सहाही विधानसभेच्या उमेदवारांसाठी कार्य करनार असल्याचे सांगितले आहे.
बीआरएसनं दिलेल्या या पाठिंब्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत असून त्यामुळे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विजयाचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
Telangana’s BRS support to Sudhir Mungantiwar