श्री . अरुण बारसागडे, उपसंपादकचिमूर विधानसभेच्या निवडणुका शांततेत पार पाडण्याचे जनतेला आवाहन.
- सावरगाव :-
महाराष्ट्र राज्यामध्ये आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात तसेच जनतेमध्ये पोलिसांविषयी आदरभाव व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता भारतीय सीमा सुरक्षा दल तसेच पोलीस स्टेशन तळोधी बा. पोलिसांचे पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये रुटमार्च काढण्यात आले.
पोलीस स्टेशन-तळोधी अंतर्गत आज दिनांक 05/ 11/ 2024 रोजी हे रुटमार्च काढण्यात आले. यावेळी नागभीड, सिंदेवाही, ब्रम्हपूरी येथील अधिकारी व अंमलदार यांचे सह हे रूट मार्च काढण्यात आले. यावेळी
पोलीस स्टेशन तळोधी बा. पोलिसांचे पोलीस स्टेशन हद्दीतील नांदेड, गिरगाव, सावरगाव, तळोधी येथे रुट मार्च काढण्यात आला. व चिमूर विधानसभेच्या निवडणुका शांततेत पार पाडण्याचे जनतेला आवाहन करण्यात आले