अरुण बारसागडे, उपसंपादक न्यूज जागर
सावरगावातून होतो रेतीची तस्करी
सावरगाव
विधानसभेच्या निवडणुकीत महसूल प्रशासन व्यस्त असल्याने रेती तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहे. नागभीड तालुक्यातील सावरगाव येथून रात्री 10 ते पहाटे पाच वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करीत आहेत त्यामुळे शासनाचा लाखो चा महसूल बुडत आहे. याकडे महसूल विभागाने जातीने लक्ष देऊन अवैध्य रेती तस्करांना आढावा. नांदेड, तुकुम,सोनुली व वाढोणा येथील रेती तस्कर प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून रात्रीच्या सुमारास रेतीची वाहतूक करीत आहेत. रेतीची वाहतूक ज्या ट्रॅक्टरने केले जातो त्यातील काही ट्रॅक्टरचे पासिंग केली नसून ट्रॅक्टरच्या मुडयांना दुसऱ्याचे नंबर देऊन राजरोज पणे अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. वाठोणा रेतीघाट बोकड डोह नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे त्यामुळे अवैध रेती तस्कर सावरगाव पादनं रस्त्यातून रस्त्यातून चिखलगावं -तळोधी मुख्यमार्गावर भरधाव वेगाने रेतीचे वाहतूक करीत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना मशागतीची कामे करण्यास अडचण निर्माण होत आहे या अवैध रेतीतस्करावर पोलीस प्रशासन व महसूल विभागाने कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्याकडून केल्या जात आहे.