श्री . अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
घरासमोरील स्कुटी बाजुला केल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाले. या हल्ल्यात एक जण ठार, तर पाच जण जखमी झाल्याची घटना मूल येथे रविवारी (दि.13) रात्री 10.30 वाजता सुमारास घडली. प्रेम चरण कामडे (17, रा. मूल) prem kamde असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सात आरोपींना अटक केली आहे. मूल येथील बबन मारोती कामडे व त्यांचा चुलतभाऊ नरेंद्र नामदेव कामडे हे जवळजवळ राहतात. रविवारी रात्रीच्या सुमारास दुचाकी बाजुला करून हातगाडी ठेला घेऊन जाण्याच्या कारणावरून वाद झाला. दरम्यान नरेंद्र कामडी व त्यांची पत्नी मनीषा कामडी narendra & manisha kamdi यांनी भांडण केल्यानंतर चंद्रपूर येथील आपल्या भावांना माहिती दिली. भाऊ राजेश खनके, सचिन खनके यांनी मित्रासह मूल गाठले. दरम्यान प्रेम कामडे, अविनाश कामडे, स्वप्निलदेशमुख, चरण कामडे, बबन कामडे, भरती कामडे यांच्यावर चाकू हल्ला केला. यावेळी प्रेमला चाकू लागल्याने त्याचा चंद्रपूरला नेताना वाटेतच मृत्यू झाला. तर अविनाश कामडे, स्वप्निल देशमुख, चरण कामडे, बबन कामडे, भरती कामडे हे जखमी आहेत. नागरीकांनी घटनेची गंभीर दखल घेत पोलिस स्टेशन गाठून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यावरून मूल पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांनी चंद्रपूर येथील राजेश खनके rajesh khanke (26), सचिन खनके sacjin khanke (27), वैभव महागावकर vaibhav mahagavkar (23), कपील गेडाम kapil gedam (23), श्रीकांत खनके shrikant khanake (28) यांना चंद्रपूर वरून अटक केली. तर मूल येथुन नरेंद्र कामडे narendra kamde (42), मनीषा कामडे manisha kamde (29) यांना मूल येथून ताब्यात घेतले आहे. आरोपींनी गुन्हयात वापरलेले वाहन, चाकू जप्त केले आहे. आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी एस.एस. भगत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, मूलचे पोलिस निरीक्षक सुमित परतेकी, सपोनि अमितकुमार आत्राम, पोउपनि भाउराव बोरकर, मपोउपनि वर्ष आत्राम, सफौ उत्तम कुमरे, राधेश्याम यादाव, केवलराम उईके, डोये, पोहवा सचिन सायंकार, भोजराज मुडरे, जमिर शेख, राकेश फुकट, परवेज पठाण, स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे
प्रेम कामडे व त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मूल येथे सर्वपक्षीय बंद पाळण्यात आले. यावेळी सर्व व्यापारी बंधुनी स्वयंस्फुर्ततेने आपआपले प्रतिष्ठाने बंद ठेवून मूल बंदला पाठिंबा दिला. दरम्यान सकाळी 8 वाजतापासून 10 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी नागरिकांमध्ये आरोपींविरुद्ध प्रचंड आक्रोश दिसून येत होता. आरोपींना फाशी द्या. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.