श्री अमित साखरे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
गडचिरोली जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने मा. पोलिस अधिक्षक नीलोतपल , अप्पर पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख, व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुरज जगताप यांच्या मार्गद्शनाखाली पोलिस दादलोरा खिडकी अंतर्गत ८/१०/२०२४ला पोलीस स्टेशन चामोर्शी च्या वतीने जुने उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय चामोर्शी येथे भव्य महिला आरोग्य व महिला जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महिला आरोग्य व जनजागरण मेळाव्याला पुरुषोत्तम घ्यार समुपदेशक ग्रामीण रुग्णलय चामोर्शी , तसेच डॉ. शिल्पा गभने, अश्विनी गोवर्धन ग्रामीण रुग्णालय चामोर्शी , पोलीस उपनिरीक्षक राधा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पुट्टेवार उपस्थित होते. तसेच पोलीस स्टेशन चामोर्शी हद्दीतील पोलीस पाटील व प्रतिष्ठित महिला उपस्थित होत्या. सदर महिला मेळाव्याचे अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक राधा शिंदे यांनी पोलीस दादा लोरा खिडकी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय लोककल्याणकारी योजना व त्यासाठी लागणारे कागदपत्र बद्दल विस्तृत माहिती देऊन त्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. श्री घ्यार यांनी महिलांच्या आरोग्याच्या समस्या विषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती डॉक्टर गमने यांनी आपल्या आरोग्य टीमसह महिलांच्या आरोग्याची तपासणी करून घोड्यावर औषध गोळ्या व औषध वाटप करण्यात आले. सदर महिला आरोग्य व महिला जनजागरन मेडाव्यादरम्यान नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने सर्व महिलांची ओटी भरून हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या मेळाव्याला चामोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील २५०ते३०० महिला उपस्थित होत्या. सदर आरोग्य व महिला जनजागरण मेढा व्याकरिता आलेल्या महिलांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच उपवास असलेल्या महिलांकरिता फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. सदर मेळावा पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशन चामोर्शीचे पोलीस निरीक्षक अमुल कादबाणे, पोलीस उपनिरीक्षक राधा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पुट्टेवार, स. फौजदार भास्कर मानकर, पोना. प्रकाश मडावी, पो शिपाई रवींद्र खोबरे, शिल्पा पोटे,मोहिनी धुर्वे, मनीषा चितळे, चंपत मडावी, तसेच पुरुष होमगार्ड व महिला होमगार्ड यांनी मोलाचे सहकार्य केले.