सुरेश एम तिट्टीवार सिरोचा तालुका प्रतिनिधी
सिरोंचा नगरम टी पाईट पासुन कालेश्वर पुला पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम अंदाजे २४ कोटी रुपयाचे सिमेट रोड काम मजुंर झाले असून सदर काम नागपुर येथील नामवंत कंपनी ला मिळाले आहे , जवळ पास एक वर्षा पुर्वी छञपती स्केअर पाईट पासुन कामला शुरूवात झाली . राष्ट्रीय माहामार्गाच्या रसत्या वर एक पुलाचे काम पूर्ण झाले असुण पुलाच्या दोन्ही बाजुला काडीमाती,पिवडी लाला माती मिक्स, आणि जुण्या डाबंर रोड ला खोदुण जे डाबंर निघाले ते मटेरीयल त्या पुलाच्या दोन्ही बाजुला टाक्यात येत आहे. news jagar
पुलाच्या दोन्ही बाजुला मुरूम किंवा रेती ने खड्डा भरने आवश्यक असताना मात्र ठेकेदार पैसे वाचण्याच्या प्रयत्नात निष्कृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
हि बाबा राष्ट्रीय महामार्गा चे प्रशासकीय अधिकाऱ्यांना समजत नाही कि मुद्दामच याकडे दुर्लक्ष देत आहेत ? असा सवाल आता नागरिकांनी करण्यास सुरवात केली आहे.