मा.खा. अशोकजी नेते यांची सामाजिक बांधिलकी – बुथ प्रमुख नामदेवराव भोयर यांच्या वडिलांची आस्थेने विचारपूस

गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्हा सामाजिक
Unique Multiservice
Share

जावेद अली गडचिरोली

दिं.११ नोव्हेंबर २०२४
गडचिरोली:- लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या हितासाठी नेहमीच कार्यरत असणारे मा.खा.तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते आपल्या संवेदनशीलतेसाठी आणि माणुसकीसाठी ओळखले जातात. नुकतीच व्याहाड बुज ता.सावली येथील बुथ प्रमुख नामदेवराव भोयर यांच्या वडिलांची प्रकृती खालावल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांना तातडीने गडचिरोली येथील स्पंदन दवाखान्यात दाखल करण्यात आले. ही बातमी मिळताच मा.खा. अशोकजी नेते यांनी दवाखान्यात भेट देऊन भोयर कुटुंबाच्या भावना समजून घेत आस्थेने त्यांच्या वडिलांची प्रकृती विचारली. News Jagar

दवाखान्यातील भेटीदरम्यान अशोकजी यांनी भोयर कुटुंबाला धीर देत त्यांच्या वडिलांची काळजी घेण्याचे सांगीतले. त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधत उपचारात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी विशेष सूचना दिल्या आणि प्रकृतीकडे अधिक लक्ष देण्याचे आवर्जून सांगितले.

मा.खा. अशोकजी नेते यांच्या या भेटीने भोयर कुटुंबाला मानसिक आधार मिळाला. अशोकजींच्या सहानुभूतीपूर्ण आणि संवेदनशीलतेच्या वागणुकीमुळे भोयर कुटुंबाला आधार मिळाला, तसेच त्यांनी भोयर यांच्या वडिलांच्या लवकरच तब्येत सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ashok nete

या प्रसंगाने समाजातील माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले. अशोकजी नेते यांच्या या कृतीने त्यांच्या नेतृत्वाची, समाजासाठी असलेल्या सेवाभावाची आणि बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचीती आली आहे. त्यांच्या या संवेदनशील वागण्यामुळे समाजातील प्रत्येकाला आधार मिळाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत