- श्री अमित साखरे, उपसंपादक
चामोर्शी:- महाराष्ट्रातील सद्याचे सरकार गेल्या दोन वर्षापासून महागाईवर नियंत्रण न आणल्यामुळे निवडणुकीच्या व दिवाळी सारख्या सनाच्या तोंडावर महागाईत प्रचंड वाढ झाली त्यामुळे सामान्य माणूस आर्थिक कोंडीत सापडला आहे त्यासाठी सामन्याचे वाटोळे करणाऱ्या महायुतीच्या अपयशी सरकारला हद्दपार करत काँग्रेसच्या उमेदवारांना या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी गाफील न राहता प्रयत्नाची पराकाष्ठा करा व विजय मिळवा असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
यावेळी काग्रेसचे गडचिरोली जिल्हा निरीक्षक मलय्या बेलई, काँग्रेसचे जिल्ाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,नितीन वायलालवार, प्रभाकर वासेकर,चंद्रकांत दोषी ,अड राम मेश्राम, के. डी.मेश्राम ,विश्वजीत कोवासे, नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, सभापती स्नेहा सातपुते, बंगाली आघाडीचे बिजेन सरदार, राजेश ठाकूर, लोमेश बुरांडे, सुमित तुरे, संजय पंदीलवार,रवींद्र पाल ,विनोद खोबे ,अनिल कोठारे, प्रमोद भगत,नितीन गद्देवार, माधव घरामी , विनय येलमुले,स्नेहा सातपुते ,नीलकंठ निखाडे,उमेश कुमरे, आदी उपस्थित होते
चामोर्शी तालुका सर्व पदाधिकारी बुथप्रमुख व कार्यकर्ते यांची गडचिरोली विधानसभा निवडणुक चे अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर तुळशीराम पोरेटी यांचे प्रचाराच्या नियोजनाची आढावा बैठक ०४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ ०० वाजता शारदा सेलीब्रेशन सभागृह तहसील रोड चामोर्शी येथे पार पडली त्यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी महायुती सरकारच्या काळात ऐन दिवाळी सारख्या सणाच्याच्या तोंडावर खाण्याचे तेल, वीज दरवाढ, कांदे, लसूण भाजीपाला , गॅस , शेतकऱ्यांना पीक विमा रककम मिळत नाही तसेच शेतकऱ्यांना उत्पादन खरचानुसर हमी भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च अधिक व नफा कमी अशी अवस्था या सरकारने शेतकऱ्यांची केली असून
बेरोजगार युवक युवतीना नैकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या नाही त्यामुळे ते हतबल झाले आहे त्यासाठी काँग्रेसचे सरकार येणे गरजेचे आहे म्हणून काँगेस उमेदवाराला मताच्या स्वरूपात मदत करत विजय खेचून आणा असेही शेवटी आवाहन केले .
याप्रसंगी काँग्रेसचे ऍड. राम मेश्राम, युवक काँग्रेसचे महासचिव विश्वजित कोवासे, कांग्रेस जिल्ह ध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे, यांनी ही मार्गदर्शन केले. तर कांग्रेस उमेदवार मनोहर पोरेटी यांनी पक्षानी माझ्यावर विश्वास ठेवत मला विधान सभेचे तिकीट दिले असून मी आपल्या पाठीशी सदैव पाठीशी राहीन कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन यावेळी दिले .
यावेळी तालुक्यातील सर्व तालुका पदाधिकारी सर्व विभाग अध्यक्ष व पदाधिकारी बुथप्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.