By Shri.Vilas Dhore, Special Correspondent , Gadchiroli Distt.
देसाईगंज (का.प्र.) :-
मराठी भाषेतील आद्य पत्रकार आणि दर्पण या मराठीमधील पहिल्या वृत्तपत्राचे संस्थापक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिन पत्रकार दिन म्हणून दि. ६ जानेवारी २०२४ रोजी स्थानिक ‘त्रिकालनेत्र’ कार्यालयात प्रेस क्लब देसाईगंज व व्हाईस ऑफ मिडीयाच्या संयुक्त विद्यमाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, दिपप्रज्वलन व पुष्प अर्पन करून साजरा करण्यात आला.
यावेळी जेष्ठ पत्रकार शामराव बारई, प्रेस क्लब अध्यक्ष प्रकाश दुबे, उपाध्यक्ष तथा व्हाईस ऑफ मिडीयाचे तालुका अध्यक्ष विलास ढोरे, प्रेस क्लब सचिव राजरतन मेश्राम, प्रा. दयाराम फटींग, प्रा, दिलीप कहुरके, अरविंद घुटके, चंद्रशेखर बांबोळे, रविंद्र कुथे, हरिश दुबे, घनश्याम कोकोडे, पंकज चहांदे आदी पत्रकार उपस्थित होते.
प्रास्ताविकात विलास ढोरे यांनी पत्रकारिता क्षेत्रात येणाऱ्या अडचणी बद्दल तसेच पत्रकारांना मिळणाऱ्या सुविधा बाबत व्हाईस ऑफ मिडीया हि संघटना देशपातळीवर काम करीत असून त्यामाध्यमाने देसाईगंज तालुक्यात सुद्धा पत्रकारांना सोई सुविधा कशा मिळवून देता येईल याकरीता बाबतचे मागदर्शन केले.
तर २२२ वर्षीपुर्वी इंग्रज राजवटीत अल्पवयात वृत्तपत्र प्रकाशित करून अन्याया विरोधात वाचा फोडणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला उजेळा पत्रकार अरविंद घुटके यांनी थोडक्यात दिला. तसेच स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि लोकतंत्र आधारीत राष्ट्रवाद कसा निर्माण व्हावा याकरीता त्यांनी आपल्या लेखनीच्या माध्यमातून जनतेला जागविण्याचे काम केले. शिवाय त्यांना संस्कृत, हिंदी, बंगाली, कन्नड, गुजराती, तेलगु, इंग्रजी, ग्रीक, लॅटिन अशा जवळपास डझनभर भाषेचा ज्ञान होता याबाबतची विस्तृत अशी माहिती चंद्रशेखर बांबोळे यांनी दिली.
कार्यक्रमाचे संचालन प्रेस क्लब सचिव राजरतन मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. दिलीप कहुरके यांनी मानले. कार्यक्रमाला प्रेस क्लब देसाईगंज व व्हाईस ऑफ मिडीयाचे सदस्य उपस्थित होते.