श्री. अमित साखरे, उपसंपादक
चामोर्शीतील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
:- गेल्या काही दिवसांपासून शहरातून जाणाऱ्या मुख्य हायवे मार्गावर मोकाट जनावरांना बस्तान रहात असल्याने वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागत असे या बाबत अनेकदा तक्रारी झाल्या मात्र जनावर मालक दखल घेतली नाही त्यासाठी आता नगर पंचायत प्रशासनाने तिसऱ्यांदा धडक कारवाई करीत मोकाट जनावरांना लोहारा गोशाळेत पाठविण्यात आले.
शहरातून जाणाऱ्या मुख्य हायवे मार्गावर दररोज मोकाट जनावरे बसत असल्याने या मार्गाने ये जा करणारे वाहन धारकांना मोठी दमछाक होत असे या बाबत अनेकदा नागरिकांनी नगर पंचायत ला तक्रारी दाखल केल्या होत्या तर जनावर मालकांनी याची दखल घेतली नाही. मागील वर्षी याबाबत दोनदा नगर पंचायत प्रशासनाने जनावरांची धरपकड करीत 23 गुरांची गोशाळेत रवानगी केली होती.पण यातून गुरांच्या मालकांनी कोणताही धडा न घेता आपली जनावरे मोकाट सोडून दिली.यामुळे शहरातील मुख्य मार्गांवर अपघाताच्या घटना घडल्या. त्याची दखल घेत नगरपंचायत चामोर्शीचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांनी मोकाट जनावराचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला. यानुसार याआधी शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येऊन गुरांच्या मालकांना आपली गुरे ताब्यात घेण्याबाबत सूचित करण्यात आले. यानंतर दि.05/11/2024 ला मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांच्या निर्देशानुसार प्रशासकीय अधिकारी भारत वासेकर व पाणीपुरवठा अभियंता स्वप्नील पिदूरकर यांच्या नेतृत्वात नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरील एकूण 20 बेवारस गुरे पकडून जप्त केली. या सर्व गुरांची डॉ.प्रदीप बावणे, तालुका लघु पशु सर्व. चिकित्सालय चामोर्शी यांचे मार्फत वैद्यकीय तपासणी करून सर्व गुरांना टॅगिंग करण्यात आले. आपल्या मालकीची गुरे सोडविण्यासाठी नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयात एकूण रु.11000/-दंड जमा करून तसेच पुन्हा गुरे बेवारस सोडणार नाही म्हणून हमीपत्र देऊन आपली 8 गुरे सोडविली. उर्वरित 12 बेवारस गुरांना लोहारा जि. चंद्रपूर येथे जमा करण्यात आले. यापुढे देखील वेळोवेळी अशी मोहीम राबविण्यात येणार असून ज्या मालकांची गुरे असे मोकाट आढळून येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाही करून दंड आकारण्यात येईल असे या प्रसंगी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. यावेळी नगरपंचायत कर्मचारी प्रभाकर कोसरे ,विजय पेद्दीवार, रमेश धोडरे, श्रीकांत नैताम, आकाश कोरवते, संतोष भांडेकर, राकेश वासेकर, उमाजी सोमणकर, रुषी गोरडवार,महादेव गेडाम व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
” नगरपंचायत चामोर्शीतील सार्वजनिक रस्त्यांवर बेवारस गुरांची समस्या गंभीर झाली असल्यामुळे शहरातील मुख्य मार्गांवर अपघाताच्या घटना घडल्या. अनेक दिवसांपासून जाहीर मुनादी देऊनसुद्धा जनावरांच्या मालकांनी गुरांचा बंदोबस्त केला नाही.यामुळे नाईलाजास्तव कारवाई करावी लागली. ही कारवाई पुढेदेखील सुरूच राहिल. ”
सूर्यकांत पिदूरकर मुख्याधिकारी नपं चामोर्शी