धाणाला 25 हजार रुपये बोनस देणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली जिल्हा महत्वाची बातमी राजकीय
Unique Multiservice
Share

श्री. विलास ढोरे, विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा

विधानसभेतील सज्जन आमदार च्या स्पर्धेत आमदार कृष्णा गजबे यांचा पहिला नंबर

देसाईगंज :- धानाला 25 हजार बोनस देणार, लाडकी बहीणीला 1500 वरून 2100 रुपये देणार, शेतकऱ्यांना संपूर्ण सातबारा कोरा करून कर्जमुक्ती करणार, सती नदी व गाढवी नदीवर बंधारे बांधणार, वडसाला बस डेपो मंजूर करणार, शेतकऱ्यांचा सन्मान निधी 15 हजार रुपये करणार, गोसीखुर्द चे पाणी आरमोरी विधानसभेतील शेतकऱ्यांना मिळणार त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून तो पाणी शेतकऱ्यांना मिळणार त्यातून शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल. देसाईगंज शहर हे व्यापारी नगरी असून या शहराला औद्योगिक हब बनविणार असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार कृष्णा गजबे यांचा प्रचार सभेला मार्गदर्शन करतांना म्हणाले.news jagar

यावेळी मंचकावर सहकार विकास महामंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, विधानसभा निरीक्षक श्रीनिवास, गडचिरोली जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, महायुतीचे आमदार कृष्णा गजबे, विधानसभा समन्वयक किसन नागदेवे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा मोतीलाल कुकरेजा, जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी, शिवसेनेचे नेते नारायण धकाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युनुस शेख, संजय साळवे, किशोर तलमले, कवाडे गटाचे मुकेश खोब्रागडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष बबलूभाई हुसैनी, भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष शालूताई दंडवते, भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष आशाताई नाकाडे, भाजपा तालुका अध्यक्ष सुनील पारधी, कुरखेडा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, आरमोरी तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, शहराध्यक्ष सचिन खरकाटे, न.प.चे आरोग्य सभापती भारतभाऊ बावनथळे आदी उपस्तित होते.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीसजी असे म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभा मध्ये सर्वात सज्जन आमदार कोण? अशी स्पर्धा जर घेतली तर त्या स्पर्धेत पहिला नंबर येईल तो म्हणजे आमदार कृष्णा गजबे यांचा असणार आहे. आमदार कृष्णा गजबे हे दहा वर्ष आमदार आहे. पण आमदारकी त्याच्या डोक्यात गेली नाही त्यांच्या वागणुकीत आणि स्वभावात फरक पडला नाही. कोण कोणत्या आमदारांना मुंबईत आल्यावर पंख फुटतात त्याला पंख फुटली नाही. मुंबईला आला तर मंत्रालय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्याकडे कामासाठी जाऊन आपल्या मतदारसंघातील कामे करून घेतात. महाराष्ट्रातील उत्तम आमदार म्हणून आमदार कृष्णा गजबे यांची खाती आहे.

कार्यक्रमाचे संचालन विनोद नागपूरकर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विलास ढोरे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत