Mungantiwar-Gaoture

डॉ.अभिलाषा गावतुरे यांची लढत हि भाजपा चे हेवीवेट नेते मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याशीच

BREAKING NEWS चंद्रपूर जिल्हा महत्वाची बातमी महाराष्ट्र राजकीय सामाजिक
Unique Multiservice
Share

काँग्रेसने ऐनवेळी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात डॉ.अभिलाषा गावतुरे यांना तिकीट नाकारून स्वतःच्या पायावर कुऱ्हाडच मारून घेतल्याचे चित्र सध्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बघायला मिळत आहे.
अभिलाषा गावतुरे या भूमिपुत्र ब्रिगेडच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात घरोघरी परिचित आहेत , सामाजिक कार्यात आणि फुले आंबेडकर चळवळीत त्यांचे मोठे नाव आहे, अलीकडेच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता व पक्षासाठी दिवस-रात्र एक करून काम करीत होत्या, मात्र काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे डॉ.अभिलाषा गावतुरे यांना पक्षाचे तिकीट नाकारण्यात आले पण कार्यकर्त्यांचा आग्रह आणि दांडग्या जनसंपर्काच्या विश्वासावर उमेदवारी अर्ज दाखल केला असून आता त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे, उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसकडून सर्वच प्रकारच्या मार्गांचा अवलंब करण्यात आला. मात्र त्यांनी माघार घेतली नाही, सध्यातरी त्याचा फटका नक्कीच काँग्रेसला बसणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. News Jagar
डॉ.अभिलाषा गावतुरे dr abhilasha gaoture यांनी प्रचारात घेतलेल्या आघाडी वरून तरी त्यांची लढत हि भाजपा चे हेवीवेट नेते मा.ना. सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांच्याशीच आहे असे दिसून येते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत