- *आदिवासी एकता युवा समिती व सहयोगी संघटनांच्या वतीने क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम*
आदिवासी समाजाची रचना अशी सुंदर असून, आपल्या आदिवासी बांधवांमध्ये ऋणानुबंध व एकोपा निर्माण झाला असून एक एकल्पीय निर्माण झाली आहे. आपला आदिवासी हा वेगळ्या विशिष्ठ संस्कृती, धर्म व परंपरा घेऊन बसलेला हा समाज आहे .
कुठल्याही समजला पुढे जायचं असेल तर त्या समाजामध्ये आदर्श अतिशय आवश्यक आहे . म्हणून समाजातील बांधवांनी ज्यांना वेळ देणे शक्य होते त्यांनी वेळ द्यावा. ज्यांना आर्थिक देणे होते त्यांनी मदत करावी. जे समाजाला योग्य मार्गदर्शन करतात त्यांनी समाज प्रबोधन करावे. व ज्या काहिच जमत नाही त्यांनी फक्त पाठीशी उभे राहावे. या चार पिल्लरच्या माध्यमातून समाजाला उभे राहण्याची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. किरण मडावी यांनी आदिवासी एकता युवा समिती तथा सहयोगी संघटनांन द्वारे आयोजित क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती महोत्सवात अध्यक्षस्थाना वरून केले. आदर्श शिवाय कुठलाही व्यक्तीची प्रगती होऊ शकत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे कि “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा “ आणि तुम्ही राज्य कर्ते जमात बनण्याचा प्रयत्न करा.
आपण आदिवासी बांधवानी एक ध्येय आणि दिशा निर्धारीत करून आपल्या अडचणी दूर करण्याची आज काळाची गरज आहे . आदिवासी समाजानी कधीही आपण मागासले समजू नये किंवा हा न्युनगंडपणा आदिवासी समाजामध्ये राहू नये, कारण पुढारलेले आणि मागासलेले यांची निश्चित व्याख्या नसून अडाणी सारखे लोक आपल्या सारख्यांची लूट मार करून पुढारलेपणा दाखवत असतील तर त्यांना आपण सुसंस्कृत किंवा विकासाची परिभाषा म्हणू शकत नाही. आदिवासी समाज हा परिपूर्ण समाज आहे, त्याची सामाजिक रचना, सांस्कृतिक रचना, धार्मिक रचना, भाषा व इतिहास आहे. म्हणून आपण मागासले नाही हे प्रत्येक आदिवासींनी समजून घेणे काळाची गरज आहे. आदिवासी समाजाला आपली मानवी मूल्य जोपासण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात आदीवासी बांधवांनी एकत्र येऊन समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी एकत्रपणे लढा देऊ असे मार्गदर्शन यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असेलेले मा. प्रियदर्शन मडावी सर यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख वक्ते असलेले मा. कैलास किलनाके, प्रा. संतोष मेश्राम यांनी सुद्धा मार्गदर्शन करुन समाजाला आज खरच बिरसाची गरज असल्यामुळे आज सर्वांना बिरसा मुंडा, तंट्या भिल, राघोजी भांगरे, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके, राणी दुर्गावती होणे काळाची गरज असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळेस आदिवासी समाजाचे लढवैय्ये समाजसेवक मा. प्रा. ॲड. अशोक तुमराम सर यांचा सत्कार समितीच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महावितरणचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी हे होते तर कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून लाभलेले गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नामदेव किरसान, डॉ. नितीन कोडवते, प्रा. रोहीदास राऊत, प्रा. अशोक तुमराम, विलास कोडापे, कुणाल कोवे, चंद्रशेखर भडांगे, गौतम मेश्राम, अर्चना टेकाम, अल्का कोल्हे हे प्रामुख्याने उपस्थित राहुन समाज बांधवास मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक आदिवासी एकता युवा समितीचे अध्यक्ष उमेशभाऊ ऊईके यांनी केले तर संचालन सचिव प्रदीप कुलसंगे व आभार मुकूंदा मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता अमोल कुळमेथे, सुधिर मसराम, संजय मेश्राम, मंगेश नैताम, बादल मडावी, प्रफुल कोडाप, आकाश कोडाप, राकेश हिचामी, साईनाथ पुंगाटी, सचिन भलावी, गिरीष ऊईके, वासुदेव कोडापे, हर्षवर्धन मडावी, शामकुमार मडावी, सुरेश मेश्राम, टिकाराम मडावी, लुमेश मडावी, बंडू रायसिडाम, गंगाधर गेडाम, मधुकर कुमरे, मालता पुडो, विद्या दुग्गा, हेमा कुलसंगे, सारिका ऊईके, चुटकी कुलसंगे, माही ऊईके, पिहु ऊईके, प्रेरणा पुंगाटी, अपर्णा नरोटे, प्रतिभा पुंगाटी, रंजना नरोटे, संगीता कुळमेथे, मंगला कुळमेथे, सरस्वती कळाम, हसिना कांदो, श्यामलता पदा, कमल कुळमेथे, शुभांगी पेंदाम, आरती कंगाले, बबीता उसेंडी, वनिता ताराम सह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.