Gadchiroli News : गोंदिया जिल्ह्यातून काही दिवसांपूर्वी परतलेल्या रानटी हत्तींनी केलेल्या हल्ल्यात एक वृद्ध महिला ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे उघडकीस आली आहे.
कौशल्या राधकांत मंडल (६७ रा. शंकरनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, २९ डिसेंबरच्या मध्यरात्री शंकरनगर येथील जंगलालगत असलेल्या घरात मंडल कुटुंब झोपी गेलेले असताना हत्तींच्या आवाजाने ते जागे झाले.
आपल्या जवळपास हत्ती आल्याचे त्यांना कळताच जीव वाचविण्यासाठी ते गावाच्या दिशेने जाण्यास निघाले. मात्र, कौशल्या मंडल हत्तींच्या तावडीत सापडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला.