पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून माओवाद्यांकडून तरुणाची हत्या; मृतदेहाजवळ पत्र
गडचिरोली एका आदिवासी तरुणाची गळा आवळून हत्या केली. अशोक तलांडी ( ३०, रा.दामरंचा ता. अहेरी) असे मृताचे नाव आहे. २९ मार्च रोजी सकाळी भामरागड-आलापल्ली मार्गावरील ताडगावजवळ ही घटना घडली. यामुळे जिल्हा हादरुन गेला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा एकदा माओवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी रेपनपल्ली हद्दीत झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. […]
Continue Reading