गोंदिया(Gondia):- देवरी बसस्थानकावरुन (Bus-stand)चीचगड मार्गे चिचगडकडे निघालेल्या (बस क्रमांक एमएच ४०,एक्यु ६०५०) मानव विकास योजनेच्या बसच्या चालकाचे नियत्रंण सुटल्याने अब्दुलटोला गावाजवळील नाल्यात बस शिरल्याची घटना सकाळी आज ७.३० वाजेच्या सुमारास घडली.
देवरी येथून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना (Students) घेऊन ही बस चिचगडकरीता रवाना झालेली होती. या बसच्या अपघातात जिवितहानी झालेली नसून विद्यार्थीनींना किरकोळ जखमा झाल्याचे वृत्त आहे. काल शिवशाही बस अपघातात ११ निष्पाप बळी गेल्याची घटना ताजी असतांना आज सकाळी देवरी परिसरात बस अपघात (Accident) झाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकांच्या हलगर्जीपणावर प्रवाशात संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे एसटीचा प्रवास सुरक्षित आहे काय? असा प्रश्न निर्माण केला जात आहे.