⭕ सैनिक समाज पार्टीचे मुख्यमंत्र्यांना जलदगती निवेदन.
⭕ कारवाई न झाल्यास प्रशासना विरोधात आंदोलन करणार.
गडचिरोली / प्रतिनिधी दि. ६/९/२०२४
येथील प्रतिष्ठित, लाचार होऊन पैशासाठी कामं करणाऱ्या मुकुंद जोशी यांच्या गटाला विना टेंडर दिलेल्या सर्व कामांची जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवाजी डमाळे, विभागीय युवा अध्यक्ष निरज कांबळे , महिला प्रदेशाध्यक्ष जयश्रीताई पाटील , महासचिव ईश्वर मोरे , कार्याध्यक्ष एच.बी उराडे , गडचिरोली विधानसभा प्रमुख पुरुषोत्तम सलामे, यांनी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , जिल्हा प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे . .
या बाबत सविस्तर वृत्त असे की, मुकुंद जोशी यांनी…. स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून SNCU अंतर्गत २०१२ ते २०१८ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यस्त्रोतांने कर्मचारी पुरवठा करण्याचे काम केलेले आहे. तसेच गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात २०१९ पासून २०२४ पर्यंत काम सुरू आहे. यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफ, ईएसआयसी आणि करारानुसार बॅंक खात्यात पैसे जमा केले नाही. नियमानुसार ई टेंडर प्रक्रिया करणे आवश्यक होते . परंतु केवळ कोटेशनवर लाखो रुपयांचे कंत्राट देण्याचे काम संबंधित प्रशासकिय अधिकारी आणि लिपीक यांनी केले आले. संबंधित व्यक्तीला धोबीचेही कंत्राट विना टेंडर दिले आहे . प्रत्यक्षात काम न करता जिल्हा सामान्य रुग्णालयातील तसेच महिला व बाल रुग्णालयातील प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळ झोकून स्वताच्या स्वार्थासाठी लाखो रुपयांची उचल करून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला आहे . विना टेंडर सतत काम देणाऱ्या प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित लिपीकावर उचित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सैनिक समाज पार्टीचे वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य संचालक, आरोग्य सचिव , जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली , जिल्हा पोलिस अधीक्षक , उपविभागीय पोलिस अधिकारी, उपसंचालक आरोग्य सेवा संचालनालय नागपूर विभाग नागपूर यांच्याकडे केली आहे. अशी माहिती गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सैनिक समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.