The abductor of a minor girl was arrested after almost 2 years

बसमधून महिला प्रवाशाकडील ७० हजारांची राेकड लंपास

गडचिराेली : चामाेर्शी ते गडचिराेली या प्रवासादरम्यान एका महिला प्रवाशाच्या पर्समधून सुमारे ७० हजार रुपयांची राेकड लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत महिला प्रवाशाने गडचिराेली पाेलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे     .गाेंडपिंपरी तालुक्यातील राळापेठ येथील पाैर्णिमा राजू राऊत यांचे गडचिराेली तालुक्यातील वाकडी येथील माहेर आहे. माहेरी येण्यासाठी सर्वप्रथम त्या […]

Continue Reading

महीला मजुरांना घेवुन जाणारी पिकअप पलटली..!चार महिला मजुरांचा मृत्यू.!ब्रम्हपुरी तालुक्यातील माहेर गावात दुःखाचे डोंगर कोसळले

ब्रम्हपुरी तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली असून माहेर(खरबी)गावातील १७ महिला मजूर चना कापणीसाठी दिनांक:-८ फेब्रुवारीला २०२४ ला बाहेर गावी जात असताना या महिला मजुरांना घेऊन जाणारा पिकअप वाहन उमरेड तालुक्यातील सिर्सी गावाजवळ पलटी झाल्याने या घटनेत चार महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे .तर काही महिला गंभीर जखमी आणि इतर महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.गंभीर जखमी […]

Continue Reading

सायबर क्राईमची शिकार झाली नागपुर ची महिला, गामवले लाखो रुपये

नागपूर : ऑनलाइन फसवणुकीच्या एका संतापजनक प्रकरणात एका महिलेने सायबर गुन्हेगारांना बळी पडून तब्बल ९.८१ लाख रुपयांचे नुकसान केले. या घटनेवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घोगली, बेसा रोड येथील रहिवासी असलेल्या ३३ वर्षीय पीडित महिलेला सुरुवातीला रोजा नावाच्या व्यक्तीने ९१६८३५२००२ या मोबाईल क्रमांकावरून ऑगस्टमध्ये संपर्क साधला होता. रोझाने तिला अर्धवेळ नोकरीची आकर्षक संधी […]

Continue Reading

छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षल्यांत धुमश्चक्री; घातपाताचा डाव उधळला, मोठा शस्त्रसाठा हाती

गडचिरोली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ फेब्रुवारी रोजी भेट दिलेल्या छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील वांगेतुरी परिसरात रेकी करायला आलेल्या नक्षली व पोलिसांत ७ फेब्रुवारी रोजी रात्री चकमक झाली. नक्षल्यांचा घातपाताचा डाव पोलिसांनी उधळून लावला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या थराराने नक्षल्यांनी दक्षिण गडचिरोलीत पुन्हा डोके वर काढल्याचे समोर आले आहे. सशस्त्र नक्षलवादी कॅडर वांगेतुरीपासून ७ किलोमीटर अंतरावर हिद्दूर गावात तळ ठोकून असून पोलिसांनी […]

Continue Reading

मंगला’ हत्तीणीच्या स्थलांतराचा पुन्हा प्रयत्न; ग्रामस्थांच्या विरोधानंतर वनमंत्र्यांचा हस्तक्षेप

गडचिरोली : राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प असलेल्या अहेरीच्या कमलापूर येथील मंगला नावाच्या हत्तीणीला पेंच अभयारण्यात हलविण्याचा डाव ७ फेब्रुवारीला पुन्हा एकदा हाणून पाडण्यात आला. ग्रामस्थांनी विरोध केल्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी यात लक्ष घातले व मंगलाला न्यायला आलेली वाहने रिकामीच परतली. जिल्ह्यातील आलापल्ली व सिरोंचा वन विभागात सात ते आठ दशकांपूर्वी वनविभागाची अवजड कामे करण्यासाठी केरळहून […]

Continue Reading

दूध विक्री करून परतताना ट्रकने चिरडले, शेतकरी ठार

गडचिरोली – दूध विक्री करून गावी परतताना शेतकऱ्याच्या दुचाकीला ट्रकने चिरडले. यात शेतकरी जागीच ठार झाला.  ही घटना ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता शहराजवळील आरमोरी रस्त्यावरील कठाणी नदीच्या पुलावर घडली. मारोती भोयर (५५, रा. महादवाडी ता. गडचिरोली) असे मृताचे नाव आहे. त्यांचा शेतीसह दुग्धव्यवसाय आहे. नित्याप्रमाणे ५ फेब्रुवारी रोजी सकाळी घरोघरी जाऊन ग्राहकांना दूध वाटप केल्यानंतर […]

Continue Reading

पतीदेवाची क्षमा मागते, लेकरांना चांगलं सांभाळा… पत्र लिहून संपवलं जीवन

गडचिरोली: ‘पतीदेवाला मी क्षमा मागते, मी तुम्हाला सोडून जात आहे, लेकरांना चांगलं सांभाळाल ही अपेक्षा आहे..’ अशी सुसाईट नोट लिहून विवाहितेने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ फेब्रुवारीला सकाळी उघडकीस कोरची शहरात उघडकीस आली. आईने जीवनयात्रा संपविल्याने दोन  चिमुकली भावंडे मातृप्रेमाला पारखी झाली आहेत. अर्चना रंजित सहारे (वय ३६, रा. वॉर्ड क्र.५ कोरची) […]

Continue Reading

वीज प्रवाहाच्या झटक्याने लाईनमनचा जागीच मृत्यू

गडचिरोली : वीज ग्राहकाच्या तक्रारीच्या अनुषंगाने वीज रोहित्रावर चढून विज पुरवठयाची दुरूस्ती करताना वीज प्रवाहाचा झटका लागल्याने खाली कोसळून लाईनमनचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी रविवारला सकाळी ११. १० वाजताच्या सूमारास येथील चामोर्शी मार्गावरील जिल्हा परीषद माध्यमिक शाळेच्या जवळ घडली. जितेंद्र गज्ज्लवार (४१) रा. भातगिरणी परीसर सर्वादय वार्ड गडचिरोली असे मृतक लाईनमनचे नाव आहे.   गज्जलवार […]

Continue Reading

नागपूर: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

नागपूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीवर यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. श्रीकांत लेकुरवाडे (२६) असे आरोपीचे नाव आहे. २०१८ मध्ये पीडित २५ वर्षीय तरुणीची श्रीकांतशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात व्हायला वेळ लागला नाही. दोघांच्या गाठीभेटी वाढल्या. श्रीकांतने तरुणीला फिरायला जाण्याचा बहाणा करून एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तिला […]

Continue Reading

भरधाव पिक अप वाहनाच्या धडकेत इसम जागीच ठार,चालक वाहन घेऊन पसार

चामोर्शी – दिनांक ३/२/२०२४ आष्टी आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली येथे भरधाव पिक अप वाहनाच्या धडकेत 60 वर्षीय इसम जागीच ठार झाल्याची घटना दिनांक दोन फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास घडली.   महादेव मडावी वय 60 वर्ष रा. चौडमपल्ली ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृत ईसमाचे नाव आहे.शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास आष्टीकडून आलापल्ली […]

Continue Reading