पित्याची अंत्ययात्रा निघाली चार मुलींच्या खांद्यावर; अश्रूंना आवर घालून दिली माती

गडचिराेली : पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीत मुलाला जास्त महत्त्व दिले असले तरी, ही मानसिकता आता बदलत चालली आहे. मुलगा जे साेपस्कार पार पाडताे ते मुलीसुद्धा पार पाडत आहेत. मग ते सत्कार्य असाे की दु:खद स्थिती. अशीच एक दुर्दैवी घटना देसाईगंज तालुक्याच्या चिखली पेठ येथे मंगळवार १२ मार्च राेजी घडली. चारही मुलीच असलेल्या वृद्धाच्या मृत्यूनंतर त्यांची शवयात्रा मुलींनीच […]

Continue Reading

संजय मीणा यांची बदली; संजय दैने गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी

गडचिरोली – येथील जिल्हाधिकारी संजय मीणा यांची बदली झाली असून त्यांच्या जागी हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांची नियुक्ती झाली. ११ मार्च रोजी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश जारी केले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. संजय मीणा हे ऑगस्ट २०२१ मध्ये गडचिरोलीत जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त […]

Continue Reading

नदीत बुडून युवकाचा मृत्यू

गडचिराेली : महाशिवरात्रीनिमित्त प्राणहिता नदीत आंघाेळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सिराेंचा तालुक्यातील गर्कापेठा येथे घडली. नागराज राजन्ना कुमरी (१९) रा. गर्कापेठा असे मृतक युवकाचे नाव आहे. नागराज हा शुक्रवारी गंगास्नान करण्यासाठी प्राणहिता नदीवर गेला हाेता. मित्रांसाेबत त्याने काही काळ अंघाेळ केली. मात्र ताे अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचे लक्षात आले. मित्रांनी […]

Continue Reading

महाशिवरात्री यात्रेत कर्तव्य बजावताना चक्कर आली, सहकारी धावले पण…

गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे महाशिवरात्री निमित्त यात्रेत बंदाेबस्त करताना सहायक उपनिरीक्षकांना अचानक भोवळ आली. त्यानंतर क्षणार्धात ते जमिनीवर कोसळले, सहकारी मदतीला धावले, तातडीने दवाखाना जवळ केला, पण दुर्दैवाने त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. ८ मार्चला दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली. भैय्याजी पत्रू नैताम (५२,रा. कोपरल्ली ता. मुलचेरा) असे मयत सहायक उपनिरीक्षकांचे नाव आहे. ते […]

Continue Reading

पत्नी गेली माहेरी अन् पतीने घेतला गळफास!

गडचिरोली : कुटुंबात कलह वाढल्याने पत्नी महिनाभरापूर्वी माहेरी निघून गेली. त्यामुळे वाढलेल्या भांडणतंट्यांमुळे पतीच्या मनातही नैराश्य आले. पत्नी माहेरी निघून गेल्याचे व काैटुंबिक कलहाचे दु:ख सोसवेना झाल्याने पतीने चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवार ६ मार्च राेजी सकाळी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी येथे उघडकीस आली. किरपाल रामजी भोंडे (३१) रा. आंधळी, असे आत्महत्या करणाऱ्या […]

Continue Reading

मका मोडला, धान गाडले; गहू, चन्यालाही मातीमोल केले!

गडचिरोली : देसाईगंजच्या पूर्वेकडील गावांच्या शेजारी असलेल्या जंगलात रानटी हत्तींनी गेल्या महिनाभरापासून ठाण मांडल्याने शेतशिवारातील त्यांचा वावर शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या रब्बी पिके शेतात आहेत. दिवसभर जंगलात राहणाऱ्या हत्तींनी २९ फेब्रुवारीच्या रात्री आपला अरततोंडी येथील शेतशिवाराकडे मोर्चा वळवून मका मोडला, धान बांध्यांत गाडले, गहू चन्यालाही मातीमोल केले. त्यामुळे शेतकऱ्यांसह वनविभाग देखील हतबल झाला आहे.सध्या शेतकऱ्यांनी […]

Continue Reading

गडचिरोलीत धावत्या बसने घेतला पेट, ऐनवेळी थांबविल्याने प्रवासी सुखरूप

गडचिरोली  : चामाेर्शी तालुक्याच्या घोट जवळील निकतवाडा गावापासून २ किमी अंतरावर धावत्या बसने पेट घेतला. ही घटना शुक्रवार १ मार्च राेजी सकाळी ६ वाजता मुलचेरा ते घोट दरम्यानच्या जंगलात घडली. चालक-वाहकाच्या प्रसंगावधानतेने बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर उतरवण्यात आले. गडचिरोलीआगाराची एम.एच. ०७ सी ९३१६ क्रमांकाची बस मुलचेरा येथे गुरूवारी मुक्कामी हाेती. ती बस शुक्रवारी सकाळी ६ वाजता […]

Continue Reading

चिमुकलीच्या नामकरणाआधीच निघाली पित्याची अंत्ययात्रा; ट्रकने जागीच चिरडले

गडचिराेली : घरात चिमुकल्या बाळाचे आगमण झाले की, कुटूंबियांच्या आनंदाला पारावार उरत नाही. दरम्यान सर्वाना चाहुल लागते, ती म्हणजे चिमुकल्याच्या नामकरण साेहळयाची. ताे दिवस कधी येताे, याची कुटूंबियांसह सर्वांनाच माेठी उत्कंठा लागलेली असते. नामकरणाची तारीख ठरली. पत्रिकाऐवजी प्रत्यक्ष भेटून नामकरण कार्यक्रमाचे नातेवाईकांना आमंत्रण देणे सुरू झाले. दरम्यान एक दिवसांवर आलेल्या नामकरण कार्यक्रमाचे नातेवाईकांना निमंत्रण देवून दुचाकीने […]

Continue Reading

बैलगाड्यांनी तेलंगणा राज्यातून दारूची वाहतूक, तस्करांनी शाेधली नवीन शक्कल

गडचिरोली : दारू तस्करी करणारे इसम पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने वारंवार नवीन क्लृप्त्या करीत असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे सिरोंचा तालुक्यातील टेकडा (ताला) येथील दारू तस्करांनी दारू तस्करीसाठी चारचाकी अथवा दुचाकी वाहनांचा वापर न करता कोणालाही संशय येणार नाही या उद्देशाने बैलगाड्यांच्या साहाय्याने तेलंगणा राज्यातून प्राणहिता नदीपात्रातून दारू आणली. मात्र, पाेलिसांच्या गाेपनीय माहितीने याचा पर्दाफाश […]

Continue Reading

माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात गडचिराेलीची शाळा अव्वल, राज्यस्तरावर झेप

गडचिराेली : राज्य शासनाच्या ‘माझी शाळा सुंदर शाळा‘ या अभिनव उपक्रमात शहरातील गोंडवाना सैनिकी विद्यालय तथा उच्च महाविद्यालय हे नागपूर विभागातून अव्वल स्थानी आलेले आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात सदर शाळा राज्यस्तरावर झेप घेतली असून राज्य शिक्षण संचालकांच्या चमुने साेमवारी या शाळेत दाखल हाेत दिवसभर या शाळेची पाहणी करून मुल्यांकन केले. सदर उपक्रमाला जानेवारी महिन्यापासूनच सुरुवात झाली होती यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातून जवळपास […]

Continue Reading