प्रियाताई झांबरे यांच्या प्रयत्नाला यश*जिवती प्रभारी तहसीलदार चिडे यांची विभागीय चौकशी

चंद्रपूर जिल्हा महत्वाची बातमी महाराष्ट्र
Unique Multiservice
Share

*प्रियाताई झांबरे यांच्या प्रयत्नाला यश

  • *जिवती प्रभारी तहसीलदार चिडे यांची शासनाकडे केली तक्रार, राजुरा तहसीलदार आणी नायब तहसीलदार यांना विभागीय चौकशीचे दिले आदेश*

सन 2022 मधील तत्कालीन प्रभारी अधिकारी तथा तहसिलदार जिवती प्रविण चिडे यांनी शासनाकडुन आलेल्या अमृत महोत्सीव निधीची अफरातफर केल्याबाबत सामाजिक कार्यकर्त्या प्रियाताई झांबरे यांनी त्यांची तक्रार शासनाकडे केलेली होती. सदर तक्रारीचे अनुंषगाने शासनाकडुन चौकशी करण्याकरीता विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांना पत्र आले होते. विभागीय आयुक्त कार्यालयाकडुन जिल्हाधिकारी कार्यलय चंद्रपूर येथे पत्र आलेले होते. त्या पत्राचे अनुंषगाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी उपविभागीय अधिकारी राजुरा यांना चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते. तत्कालीन उपविभागीय अधिकारी श्री खलाटे यांनी चौकशी करुन प्रविण चिडे यांनी शासनाकडुन आलेल्या निधीचा वापर नियमानुसार केला नसल्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना सादर केला होता. पंरतु जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडुन मागील एक वर्षापासुन कुठलीही कार्यवाही न होता परत चौकशी करण्याकरीता उपविभागीय अधिकारी राजुरा यांना पत्र दिलेले होते. सदर पत्राचे अनुंषगाने उपविभागीय अधिकारी राजूरा यांनी ऑगस्ट महीन्यामध्ये चौकशी करण्याकरीता तहसिलदार राजुरा आणि त्यांचे अधिनस्त असलेले श्री तेलंग यांची समिती स्थापन केलेली आहे. पंरतु अजुन पावेतो हया समितीने चौकशी करुन कुठलाही अहवाल सादर केलेला नाही.
प्रविण चिडे यांनी बोगस देयके जोडुन शासनाची कशी फसवणुक केलेली आहे याबाबत सर्व पुरावा प्रियाताई झांबरे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देवुन सुध्दा अजुन पावेतो भ्रष्ठ अधिकारी यांचेवर कुठलीही कार्यवाही करत नाहीत यामागे जिल्हाधिकारी , चंद्रपूर यांचा उदेश काय आहे याचा बोध होत नाही.
जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना प्रियाताई झांबरे यांनी जिवती तालुक्यामध्ये श्री कम्पुटर यांचेकडे कुठलीही बॅनर मशीन नाही पंरतु त्यांचे नावाने कितीतरी देयके उचलुन खाल्याचे पुरावे दिलेले आहे. याबाबत प्रियाताई झांबरे यांनी श्री कम्पुटर यांचेशी संपर्क करुन हकीकत विचारणा केली असता त्यांनी असे सांगीतले की, प्रविण चिडे यांनी त्यांचेकडुन बोगस बिले धमकावुन बनवुन घेतली होती. आणि त्याबाबतचे पैसे सुध्दा त्याला दिलेले नाही. त्यांचे नावाने भलेही ऑफीस बुकात नोंद असली तरी त्यांनी पैसे उचलेले नाही असे सांगीतले पंरतु प्रशासनानी त्यांचा खुलासा घेतलेला नाही. बॅकेतुन दिलेला धनादेश हा नगद उचल केला कि खातेदारांच्या खात्यावर जमा झाला याबाबत शोध घेतला नाही. त्यामधील एकच बिल श्री कम्पुटर यांचे नावाने दिले होते. पंरतु त्याची बिलाचे पैसे त्यांचेकडुन धमकावुन घेतल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे.
तसेच जय भवानी ट्रान्सपोर्ट जिवती मध्ये नसुनही त्यांचे नावाने बोगस देयके उचल केलेले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जय भवानी ट्रान्सपोर्ट दिलेला मोबाईल क्रमांक हा एका स्त्रीचा असुन तीला हया गोष्ट्रीचा नाहक त्रास झालेला आहे. असे असताना सुध्दा शासनानी प्रविण चिडे या भ्रष्ट व्यक्तीवर कुठलीही कार्यवाही केलेली नाही.
तसेच प्रविण चिडे यांनी 26 जानेवारी 2022 रोजी सदाम शेख हया व्यक्तीचा गाडी पकडुन तिच्यावर पळुन गेल्याच्या आरोपाखाली पोलीस स्टेशन जिवती येथे केस करण्याकरीता पत्र दिलेले होते. पोलीसाकडे प्रकरण गेल्यामुळे सदाम शेख यांनी प्रविण यांना पैसा देवुन गाडीवरील कार्यवाही मागे घेतली यामुळे शासनाना मिळणारे 3 लाख रुपये प्रविण चिडे आपल्या खिशात घातलेले आहे. याबाबत सर्व पुरावे जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना देवुनही ते कुठलीही प्रविण चिडे यांचेवर कार्यवाही करीत नाही. ही चुक एखादया कर्मचारी यांनी केली असती तर 15 दिवसात त्यांचेवर कार्यवाही करुन विभागीय चौकशी झाली असती. प्रविण चिडे यांनी पैस्यासाठी कित्येक कर्मचारी यांना नाहक त्रास दिल्याचे दाखले आहेत.प्रविण चिडे यांना याबाबत माहीती मागतली असता सदर माहिती गोपनिय असुन कुणालाही देता येत नाही म्हणुन माहीतीचे अधिकार फेटाळले आहेत. प्रविण चिडे यांनी कर्मचारी यांचे कडुन सन 2022 मध्ये 30 ते पस्तीस किरकोळ रजा दिलेल्या आहेत. ज्या की शासनाकडुन फक्त 8 दिवसाची किरकोळ रजा असते. एखादा कर्मचारी मेडीकल रजेवर गेला असता जो पैसे दिला असेल त्यांचे पगार वेळेवर काढतो तसेच ज्यांनी पैसे दिले नाही त्यांना मेडीकल बोर्डाकडे पाठवुन त्यांना नाहक त्रास देण्याचे काम केलेले आहे. अजुनही काही कर्मचारी यांचे पगार देयके प्रविण चिडे यांनी काढलेले नाहीत .

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत