आरमोरी विधान सभा क्षेत्रात आप ची एंट्री

BREAKING NEWS गडचिरोली जिल्हा महत्वाची बातमी राजकीय
Unique Multiservice
Share

भरत दयलानी द्वारा

देसाईगंज :

आरमोरी विधानसभेत आपले संघटन मजबूत करण्यासाठी आम आदमी पक्षाने कंबर कसली असून, येथे आप पक्ष संघटन झपाट्याने वाढवत आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीत आप पक्षाने काँग्रेसचा प्रचार केला होता, त्यामुळे काँग्रेसला भरपूर फायदा झाला होता, विशेषत: आप पक्षाने देसाईगंजमध्ये बूथ उभारून भाजपची बरीच मते बदलली होती, मात्र विधानसभेत आरमोरी विधानसभेत आम आदमी पार्टी कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार याबाबत आप पक्षाची भूमिका वेगळी असल्याचे दिसून येत आहे. आप पार्टी चे कार्यकर्ते आणि मतदार हे मूक ( saylent ) मतदार असल्याने आरमोरी विधानसभेत मोठा बदल घडू शकतो, हे नाकारता येणार नाही. तसेच गडचिरोलीतही विरोधी पक्षातून उभे असलेले आम आदमी पक्षाचे बारकृष्ण सवसागडे यांना आपचे कार्यकर्ते पाठिंबा देत असून, आरमोरी विधानसभेत आप पार्टी १५ नोवेम्बेर पत्ते खोलणार आहे असे आप चे देसाईगंज चे पदाधिकारी यांनि सांगितले ,आप च्या निर्णयाने आरमोरी विधान सभा शेत्रात मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. news jagar

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत