गडचिरोली, दि. 19 : जिल्हयाच्या दक्षिण भागातील जंगल परिसरात आज पहाटेच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाल्याची माहिती आहे. या चकमकीत चार नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश आल्याचे कळते. गडचिरोली पोलीस दलाचे सी-60 कमांडो अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली जंगल परिसरात अभियान राबवित असतांना पोलीस नक्षल चकमक उडाल्याचे सांगण्यात येत असुन या चकमकीत चार नक्षल्यांना कठस्नान घालण्यात पोलीस दलास यश आले आहे. दरम्यान घटनास्थळावरुन पोलीसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त केल्याचे कळते. चकमकीत ठार झालेल्या चारही नक्षल्यांवर 36 लांखांचे बक्षीस होते असेही समजते.