नदीत बुडून युवकाचा मृत्यू

गडचिरोली जिल्हा
Unique Multiservice
Share

गडचिराेली : महाशिवरात्रीनिमित्त प्राणहिता नदीत आंघाेळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सिराेंचा तालुक्यातील गर्कापेठा येथे घडली.

नागराज राजन्ना कुमरी (१९) रा. गर्कापेठा असे मृतक युवकाचे नाव आहे. नागराज हा शुक्रवारी गंगास्नान करण्यासाठी प्राणहिता नदीवर गेला हाेता. मित्रांसाेबत त्याने काही काळ अंघाेळ केली. मात्र ताे अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असल्याचे लक्षात आले. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. ताे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. ही बाब त्याच्या मित्रांनी गावात फाेन करून सांगितली. गर्कापेठाचे उपसरपंच व्यंकटी दासरी यांनी नाव चालक राजन्ना दुर्गय्या गाैरारपू यांना साेबत घेऊन नदीपात्र गाठले. काही कालावधीतच नागराजचा मृतदेह शाेधून काढला. नागराजच्या मृत्यूमुळे गर्कापेठा गावावर शाेककळा पसरली आहे. महाशिवरात्रीच्या आनंदावर विरजण पडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत