The abductor of a minor girl was arrested after almost 2 years

बसमधून महिला प्रवाशाकडील ७० हजारांची राेकड लंपास

गडचिरोली जिल्हा
Unique Multiservice
Share

गडचिराेली : चामाेर्शी ते गडचिराेली या प्रवासादरम्यान एका महिला प्रवाशाच्या पर्समधून सुमारे ७० हजार रुपयांची राेकड लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत महिला प्रवाशाने गडचिराेली पाेलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे

 

 

.गाेंडपिंपरी तालुक्यातील राळापेठ येथील पाैर्णिमा राजू राऊत यांचे गडचिराेली तालुक्यातील वाकडी येथील माहेर आहे. माहेरी येण्यासाठी सर्वप्रथम त्या आष्टी येथून चामाेर्शी येथे पाेहाेचल्या. नंतर चामाेर्शी येथून अहेरी-ब्रह्मपुरी या बसमध्ये बसल्या. त्यांच्यासाेबत त्यांची दाेन लहान मुले हाेती. बसमध्ये गर्दी असल्याने त्या सर्वात मागच्या सिटरवर जाऊन बसल्या. दरम्यान, येवली येथे बस आल्यानंतर पर्स बघितले असता पर्समध्ये पैसे नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना धक्काच बसला. वैशाली यांनी ही बाब बसचे वाहक पाैर्णिमा टेंभुर्णे यांच्या लक्षात आणून दिली. बस गडचिराेली पाेलिस स्टेशनमध्ये लावण्यात आली. यावेळी बसमध्ये ५३ प्रवासी हाेते. या सर्व प्रवाशांची पाेलिसांनी झडती घेतली. मात्र एकाही प्रवाशाकडे पैसे आढळले नाही.

याबाबत वैशाली यांनी सांगितले की, त्यांनी चामाेर्शीत पर्स तपासली तेव्हा पर्समध्ये पैसे हाेते. त्यामुळे पैसे चामाेर्शीनंतरच्या प्रवासादरम्यान चाेरीला गेले असण्याची शक्यता आहे. चामोर्शीवरूनच त्यांच्यासाेबतच काही प्रवासी बसमध्ये चढले. त्यातील दाेन प्रवासी तळाेधीत तर नऊ प्रवासी कुनघाडात उतरले. त्यांच्यापैकीच काही जणांनी पैसे लंपास केले असण्याची शक्यता वैशाली राऊत यांनी केली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत