कमलापूरचे आठ हत्ती बारा दिवसांच्या वैद्यकीय रजेवर; वैद्यकीय तपासणीसह उपचार

गडचिरोली : सिराेंचा वन विभागातील कमलापूर वनपरिक्षेत्र मुख्यालयात राज्यातील एकमेव हत्तीकॅम्प आहे. येथे कार्यरत सर्वच आठ हत्तींना चाेपिंग म्हणजेच वैद्यकीय कारणांसाठी २ जानेवारीपासून १२ दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सुटीच्या नियाेजित दिवसांत कॅम्पमधील हत्तींचे दर्शन पर्यटकांना हाेणार नाही. वाढत्या थंडीमुळे हत्तींच्या तळपायाला भेगा पडतात. चालताना त्यांना त्रास होतो. त्या भेगांवर आणि दुखऱ्या पायांवर […]

Continue Reading

फसलेले ट्रॅक्टर चालकाच्याच अंगावर उलटले; चिखलात दबून मृत्यू , ठाणेगावातील घटना

गडचिराेली : शेतात कापणी केलेल्या तुरी घरी आणण्यासाठी जात असताना बांध्यांमध्ये ट्रॅक्टर फसले. चिखलातून ते बाहेर काढताना ट्रॅक्टर उलटले. चारही चाके वर झाल्याने यात दबून चालकाचा मृत्यू झाला. ही घटना आरमाेरी तालुक्याच्या ठाणेगाव येथील शेतशिवारात शुक्रवार २ फेब्रुवारी राेजी दुपारी १ वाजता घडली. सुरेश दुधराम लट्ठे (५०) रा. ठाणेगाव असे ठार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. […]

Continue Reading

वळणावर अपघात; पित्यासह लेक ठार ! दुचाकी-ट्रॅक्टरची समाेरासमाेर धडक

गडचिराेली : स्वगावाहून दुचाकीने एटापल्ली येथे कामानिमित्त येत असलेल्या पिता व लेकीचा दुचाकी-ट्रॅक्टरच्या समाेरासमाेर धडकेत मृत्यू झाला. ही घटना एटापल्ली- गट्टा मार्गावरील महादेव मंदिर वळणावर बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. राजू झुरू आत्राम (४८) व करिश्मा  आत्राम (२१) रा. देवपहाडी असे अपघातात ठार झालेले वडील व लेकीचे नाव आहे. तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावरील देवपहाडी येथून […]

Continue Reading

अल्पवयीन मुलगी रहस्यमयरित्या झाली गायब; आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

गडचिराेली: कुटुंबियांना काहीही न सांगता घरातून निघुन गेलेली १६ वर्षीय मुलगी सायंकाळी परतली नाही. सर्वत्र शोधाशोध व नातेवाईकाकडे चौकशी करूनही मुलगी सापडली नाही, त्यामुळे तिच्या वडीलांनी थेट आरमाेरी पाेलिस ठाण्यात धाव घेत याबाबतची तक्रार दाखल केली.  आरमाेरी पाेलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावातील इयता अकरावीला शिकणारी अल्पवयीन मुलगी २२ जानेवारी राेजी सकाळी ११ ते दुपारी १ […]

Continue Reading

हनी ट्रॅप प्रकरणातील आराेपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पाेलिस काेठडी

गडचिरोली : येथील एका सहायक अभियंत्याला ”कॉलगर्ल”च्या माध्यमातून ”हानीट्रॅप”मध्ये अडकवून दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या चार आराेपींना पाेलिसांनी साेमवारी अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. ५ फेब्रुवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे. एक महिला आराेपी फरार असून, तिचा शाेध पाेलिस घेत आहेत. सुशील गवई, रविकांत कांबळे, रोहित अहिर, ईशानी (सर्व रा. नागपूर) अशी अटक […]

Continue Reading

उंचीवर आक्षेप, दाेघांची नागपुरात हाेणार पुनर्माेजणी; चेन्नईवरून उपकरणासह येणार चमू

गडचिराेली : जिल्हा पाेलिस भरतीत २०२३ मध्ये प्रदीप मल्लेलवार व सुभाष गुट्टेवार या दाेघांची अंतिम निवड झाली हाेती. परंतु त्यांच्याबाबत पाेलिस विभागाला आक्षेप प्राप्त झाल्यानंतर त्यांची पुनर्माेजणी करण्यात आली. यात ते अपात्र आढळल्याने त्यांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले. याला दाेघांनीही उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिल्याने दाेन्ही उमेदवारांची पुनर्माेजणी चेन्नई येथील चमूद्वारे ६ फेब्रुवारी राेजी […]

Continue Reading

गडचिरोलीतील १० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; लोकसभेसाठी खांदेपालट

गडचिरोली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलात खांदेपालट करण्यात आली आहे. राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने ३० जानेवारीला जारी केले. यात नक्षलप्रभावित गडचिरोलीमधील १० अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांच्या जागी नवे अधिकारी येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वजिल्ह्यात कार्यरत असलेल्या तसेच ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या बदलीपात्र अधिकाऱ्यांची माहिती मागवली होती. […]

Continue Reading

बसचे एक्सल तुटले, २५ प्रवासी बालंबाल बचावले, चालकाचे प्रसंगावधान

गडचिरोली : अहेरी बस आगारातून सिरोंचा मार्गाने सकाळी ९:३० वाजता निघालेल्या मानव विकास मिशनच्या बसेसचे एक्सल उमानूर पहाडीवर तुटले. ही बाब वेळीच चालकाच्या लक्षात आली व त्याने बस जागीच रोखली सुदैवाने अपघात टळला व बसमधील २५ प्रवासी बालंबाल बचावले. ही घटना मंगळवारी दुपारी १२:३० वाजता सिरोंचा पासून ३२ किमी अंतरावर घडली. अहेरी बस आगाराची अहेरी- आसरअल्ली- […]

Continue Reading

गडचिरोलीच्या अभियंत्यावर नागपुरात हनी ट्रॅप; पत्रकार, पोलिसासह पाच जण जेरबंद

गडचिरोली : येथील एका सहायक अभियंत्याला ‘कॉलगर्ल’च्या माध्यमातून ‘हानीट्रॅप’मध्ये अडकवून १० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार २९ जानेवारीला उजेडात आला. नागपुरातील एका पत्रकार, पोलिस अंमलदारासह पाच जणांना गडचिरोली गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. आरोपींत दोन महिलांचा समावेश आहे. गडचिरोली येथे एक सहायक अभियंता कार्यरत आहेत. ४ डिसेंबर २०२३ रोजी नागपुरात एका कॉल गर्लसोबत हे अभियंता नागपुरातील एका हॉटेलमध्ये […]

Continue Reading

क्षुल्लक कारणातून युवासेना शहर प्रमुख शिवाची हत्या आठ जन अटकेत

Chandrapur : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे युवासेना शहर प्रमुख शिवा मिलिंद वझारकर (Shiva Milind Vajharkar) हत्येप्रकरणी उबाळा गटाचा परिवहन सेनेचा जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रेती तस्करीच्या वादातून ही घटना घडल्याची चर्चा सुरू आहे. स्वप्नील चंद्रकांत काशीकर (38), रिझवान अजहर पठाण (30), नाजीर रफिक […]

Continue Reading