राज्य शासन पुलियाची व्यवस्था करू शकत नाही काय?-एकरा खुर्द वासी

BREAKING NEWS गडचिरोली जिल्हा
Unique Multiservice
Share

*!गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्प जवळ दोन किलोमीटर अंतरावरील एकरा ( खुर्द) गाव गेल्या इतक्या वर्षानंतरही पूलिया पासून वंचित!*

*!सुर्जागड येथील लोहखनिज नेण्याकरिता या भागात पक्के रस्ते आणी मोठ मोठाले पुलिया होऊ शकतात तर आम्ही येथील रहिवासी असून आमच्यासाठी  राज्य शासन पुलियाची व्यवस्था करू शकत नाही काय?*

*!राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे यांचा पुढाकार!*

*दिनांक 3 डिसेंबर 2024* *गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायत अंतर्गत लोह उत्खनन पहाडी सुरजागड जवळच असलेल्या एकरा (खुर्द) गावात स्वातंत्र्याचे इतके वर्षानंतर सुद्धा गावाला लागूनच असलेल्या मोठ्या नाल्यावर पुलीयाची मागणी करत आहे परंतु आजपर्यंत या गावातील नाल्यावर पुलीया मंजुर झाला नाही? आणि या गावातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात जगणार की मरणार अशी अवस्था होते? गावात येण्यासाठी अक्षरशा दरवर्षी पावसाळ्यात नावेचा वापर करावा लागतो? विद्यार्थ्यांना एटापल्ली येथे शाळा महाविद्यालय येथे शिक्षण घेण्यासाठी अडचण निर्माण होते शाळा महाविद्यालयात पोहोचू शकत नाही ?आजपर्यंत गावातील बिमार व्यक्ती ,गर्भवती माता भगिनी यांचे किती तरी जीव गेले आहेत ? परंतु आजपर्यंत या गावात अवागमन करण्यासाठी राज्य सरकारने पुलीया मंजूर केले नाही? या संपूर्ण गावातील नागरिकांचा येथील, प्रशासन व राज्य सरकार वर खूप मोठा रोष आहे? राज्य सरकारकडे आजपर्यंत सदर पुलीया मंजुर करण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले,परंतु आजपर्यंत या गावाला दळणवळणाने जोडणारा सदर पुलीया मंजूर झाला नाही?आज या गावातील नागरिकांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेश अध्यक्ष डॉ, प्रनय भाऊ खुणे यांना गावकऱ्यांनी आपली समस्या व आपबिती* *सांगण्यासाठी बोलावले आणि त्या नाल्यावरच सर्व गावकऱ्यांनी एकत्रित होऊनआपली व्यथा मांडली यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे गावातील नागरिक यांनी गावातील रहदारीसाठी राज्यसरकार कडे सदर पुलिया मंजूर करण्याची मागणी केली व गावकऱ्यांनी बोलताना* *सांगितले आमच्या गावाजवळील सूर्जागड पहाडी वरील लोह खनिज उत्खनण्याच्या दळणवळणसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते आणि पुलीया राज्य सरकार तयार करीत आहे मग आम्ही येथील स्थानिक रहिवासी असून राज्य सरकार आमची सोय सुविधा का करत नाही? असा सवाल केला आहे यावेळी गावकऱ्यांनी राज्य सरकारने सदर पुलीया मंजूर न केल्यास येथील लोहखनिज प्रक्षेत्र येथे येणाऱ्या तोडसा ग्रामपंचायत अंतर्गत एकरा (खुर्द ),झारेवाडा, पेठा, एकरा टोला या सर्व गावकऱ्यांचा विराट जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी एकरा ( खुर्द) येथील नागरिक व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद सैयद, व जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी व प्रामुख्याने गावकरी कन्ना नरोटी, मंगेश हलामी,बाजीराव गोटा सुधाकर नरोटे मनोज गोटा सुरेश नरोटे साधू गावडे गावकरी आणी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते*

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत