15-year-old minor girl rescued  - Case registered against retired naval officer and  wife

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीची राहत्या घरातून सुटका-निवृत्त नौदल अधिकारी व पत्नीवर गुन्हा दाखल

BREAKING NEWS CRIME नागपुर महत्वाची बातमी महाराष्ट्र सामाजिक
Unique Multiservice
Share

नागपूर : घरगुती कामासाठी मोलकरीण म्हणून आणलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची रविवारी कोराडी पोलिस ठाण्यांतील बोकारा परिसरात राहत्या घरातून सुटका करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी निवृत्त नौदल अधिकारी उमेश कुमार शाहू umesh kumar shahu (68), आणि त्यांची पत्नी मंजू शाहू maju shahu  (64) यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर गंभीर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. newsjagar

घरकामात मदत करण्यासाठी झारखंड येथून सदर १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला नागपुरात आणले होते. तिला बाहेरील लोकांशी संवाद करण्यास मज्जाव करण्यात आला, दरम्यान तिच्याकळून नकळत झालेल्या चुकांसाठी तिच्यावर शारीरिक अत्याचार आणि कठोर वागणूक दिली गेली,  तिला घरातच बंदिस्त करण्यात आले, उमेश कुमार शाहू व पत्नी मंजू शाहू हे बाहेर जात असतांना तिला आतमध्ये बंद करून जात असत.
शाहू दाम्पत्याविरुद्ध बालहक्क संरक्षण कायदा, बाल न्याय कायदा आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 143 नुसार बाल तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. news jagar

15-year-old minor girl rescued  – Case registered against retired naval officer and  wife

गुप्त माहितीच्या आधारे बाल हक्क संरक्षण समिती आणि कोराडी पोलिसांनी बचाव मोहीम राबवली असून नेतृत्व चाइल्डलाइनच्या प्रतिनिधी मीनाक्षी धडाडे Minakshi Dhadade यांनी केले आणि पोलिस उपायुक्त (डीसीपी) निकेतन कदम Niketan Kadam  यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली.
सदर मुलीला तिच्या सुरक्षेसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत