सुरेश टिपट्टीवार
सिरोंचा येथे प्रहार जन शक्ती पक्षा कडून अहेरी विधान सभेचे अधिकृत उमेदवार निता तलाडी यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले.
या प्रचार सभेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बचू कडू यांची उपस्थिती होती. बचू कडू यांनी आपल्या भाषणेत म्हंटले की मी गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा येथे मी पहिल्यांदा आले आहो आणि हे गाव अती सुंदर आहे मात्र या अगोदर असलेले आमदारांनी या गावाचा विकास केला नाही. News Jagar
जर आमच्या पक्षाचे उमेदवार निता तलांडी जर या निवडणुकीत विजय झाले तर या गावाला मी दर सहा महिन्याला एकदा येईन व या जिल्हयाचा व गावाचा विकास करीन असे बचू कडू यांनी आपल्या भाषणेत म्हंटले आहे.
यावेळी माजी आमदार पी. आर. तलाडी, माजी पंचायत सभापती सौ.सगुना पी. तलाडी, रिटायर्ड तहसिलदार शंकर पुप्पालवार व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .