sudhir mungatiwar -news jagar

समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकासाचा ध्यास : ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार

गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्हा महत्वाची बातमी महाराष्ट्र राजकीय
Unique Multiservice
Share

मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावनिहाय कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला. सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी जनतेची सेवा केली. विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साधता आला याचे मनस्वी समाधान आहे. व्यवसाय वृद्धी, रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून या मतदारसंघाच्या विकासासाठी या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून कटीबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. news jagar

कोठारी येथे नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यात आरोग्य ‌व्यवस्थेशी संबधित अनेक विकासकामे केली. त्यासोबतच आरोग्य शिबीर, नेत्रचिकित्सा शिबिराच्या माध्यमातून मोतीबिंदूंचे ऑपरेशन्स केले. जिल्ह्यातील टाटा कॅन्सर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, सैनिकी शाळा, एस.एन.डी.टी विद्यापीठ, बॉटनिकल गार्डन, स्टेडियम, सिमेंट रस्ते अशी असंख्य कामे करून विकास काय असतो हे दाखवून दिले.

प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत अंतर्गत सिमेंट रस्ते, ग्रामपंचायत इमारत, पाणीपुरवठ्याच्या योजना, आरो मशीन, ओपन जीम, स्मशानभूमी अशा विविध सोयी-सुविधांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळेच काँग्रेसला पराभवाची धडकी भरली आहे. काँग्रेसने जातीपातीचे राजकारण करून विकासाचा खोळंबा केला. पाच वर्षे काँग्रेसचा खासदार सत्तेत असतांना देखील एकही विकासात्मक कामे केली नसून महायुती सरकारवर बोट उचलतात अशी टीका ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

 

मानोरा गावातील संताजी सभागृहासाठी २५ लक्ष, बौद्ध समाजाकरीता २० लक्ष, मुस्लिम समाज बांधवांच्या कब्रस्तानकरिता २५ लक्ष, आदिवासी समाज बांधवांकरिता ३० लक्ष तसेच पंचशील मत्स्यपालन संस्थेच्या इमारत बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून दिला. इटोली गावातील हनुमान मंदिराकरिता ३० लक्ष, तेली समाजासाठी ३० लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. इटोली वासियांच्या मागणीनुसार गुरुदेव सेवा मंडळाकरीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा उभारणार असून इटोली तलावाचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

 

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन कोठारी नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्णत्वास नेईल. कोठारी येथे व्यापारी संकुलाची निर्मिती, वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम, पाणीपुरवठा योजना तसेच कोठारीतील क्रीडापटूंसाठी क्रीडागंणाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.

 

कवडजई गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तसेच वीर बाबुराव शेडमाके यांचा पुतळा, सिमेंट रस्ता, जमिनीचे पट्टे, ओपन जिम आदी विकासात्मक कामे येत्या काळात पुर्ण करण्यात येईल. मांगली तलावाचे बांधकाम सन १९९६-९८मध्ये पूर्णत्वास नेले. या तलावाचे खोलीकरण, नूतनीकरण व सौंदर्यीकरण करण्यात येईल. पिण्याच्या पाण्यासह सोलर व्यवस्था, गावातील नाला खोलीकरण, शेत पाणंद रस्ते तसेच सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यात येईल

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत