prakash ambedkar

संविधान नाही तर काँग्रेस पक्ष खतऱ्यामध्ये आहे-प्रकाश आंबेडकर

गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्हा नागपुर महत्वाची बातमी महाराष्ट्र राजकीय राष्ट्रीय
Unique Multiservice
Share

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून नवे सरकार देखील स्थापन झाले . मात्र विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांकडून आता ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत मात्र सुरवातीपासूनच ईव्हीएमवर संशय व्यक्त करणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. newsjagar

आंबेडकर म्हणले की, ईव्हीएमविरोधात आम्ही आंदोलन सुरू केलं आहे. निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहानंतर झालेल्या मतदानाचे डिटेल्स मागितले आहेत. आयोगाच्या उत्तराची वाट पाहात आहोत. मारकडवाडी सारखी परिस्थिती गावागावत आहे, गावागावत रोष आहे. मारकडवाडी येथील गावकाऱ्यांचा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या निर्णयाला आडवीण्याचा सरकार किंवा पोलिसांना आधिकार नाही. सरकारने मारकडवाडी येथील ग्रामस्थांना अडविल्याने संशय बळवतो की यांनी गडबड केली आहे, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केले आहे. News Jagar

पुढे बोलताना ते म्हणाले की, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी मारकडवाडी या गावातील मतदान थांबाविण्याचा आदेश दिला होता का? याबाबत एकनाथ शिंदे यांनी खुलासा करावा. मी अनेकदा म्हटलं की हे ईव्हीएम पूर्वी काँग्रेसकडून पाडण्यासाठी वापरलं जात होतं. आता हे भाजपकडून निवडणुका जिंकण्यासाठी वापरलं जात आहे. सर्वोच्च न्यायालायचे न्यायाधीश ईव्हीएमचा मुद्दा बघायला तयार नाहीत. राज्यात आलेलं बहुमत हे ईव्हीएमचं बहुमत आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संविधान नाही तर काँग्रेस पक्ष खतऱ्यामध्ये आहे . काँग्रेसने आम्हाला बाहेर का ठेवलं? याचा पहिल्यांदा खुलासा करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत