दिनांक:- ०५ ऑक्टोंबर २०२४
श्री . नंदकिशोर वैरागडे विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची:- गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी, बहुल,नक्षलग्रस्त भागात वसलेल्या कोरची तालुक्यातील महिलांच्या सन्मानार्थ विविध योजनांची माहिती तसेच ‘भारतीय जनता पक्षाची वारी, लाडक्या बहिणींच्या दारी’ उपक्रमातून आज, शुक्रवार दिनांक: ०४ ऑक्टोंबरला सकाळी १२ वाजताच्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे वतीने भव्य महिला मेळावा स्व. मोरेश्वर फाये विज्ञान महाविद्यालय खुणारा (कोरची) या ठिकाणी संपन्न झाला.
सदर मेळाव्याचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून अजलापुर श्रीनिवास भाजपा प्रवक्ता प्रदेश तेलंगणा, अल्काताई आत्राम प्रदेश महामंत्री भाजपा महिला आघाड़ी, सविताताई पुराम सभापति महिला व बालकल्याण जि. प. गोंदिया, संजीवशहा कुंजाम माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष मोहला, गीताताई हिंगे जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाड़ी गड़चिरोली, नम्रता सिंह जिल्हा महामंत्री भाजपा महिला आघाड़ी मोहला, मोतीलाला कुकरेजा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गड़चिरोली, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शालुताई दंडवते, प्रामुख्याने उपस्थित होत्या.
महिला मेळाव्यास संबोधित करतांना आमदार कृष्णा गजबे म्हणाले की, माझ्या माता-भगिनिंसाठी भाजपा सरकारने विविध प्रकारच्या योजना आणल्या आहेत. महिला सक्षमीकरणा बरोबरच महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर होण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातुन लखपती दिदी योजना, कुटुंबासाठी हातभार लागावा व आर्थिक समस्या मार्गी लागावी; यासाठी मुख्यमंत्री-लाडकी बहिण योजना, मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री योजना, महिला उद्योगिनी योजना, सुकन्या समृध्दी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, महाराष्ट्र विधवा पेंशन योजना, महिला समृध्दी कर्ज योजना व इतर अश्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. गोर- गरीब, सर्वसामान्य नागरिक यांच्या हितावह काम हे भाजपा सरकार करीत आहे. मात्र, आपण अनेकदा विरोधकांच्या भूलथापांना बळी पडतो आहे; विरोधकांच्या कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता आपणासाठी आणखी विविध योजना आखण्याचा आमचा मानस आहे. असे ते मेळावा प्रसंगी बोलत होते.
सदर महिला मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी विविध योजनांबाबत माहिती दिली. मेळाव्यास कोरची शहरासह तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. सदर मेळावा उत्कृष्टरित्या पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय जनता पक्षाचे कोरची तालुकाध्यक्ष नसरूद्दीन भामानी, जिल्हा सचिव आनंद चौबे, जिल्हा सचिव प्रा. देवराव गजभिये, भाजपा तालुका महामंत्री गुड्डू अग्रवाल, भाजपा तालुका महामंत्री नंदलाल पंजवाणी, भाजपा महिला आघाड़ी अध्यक्ष शीलाताई सोनकुत्री, जिल्हा उपाध्यक्ष गिरजा कोरेटी, युवा मोर्चा अध्यक्ष कोरची डॉ. बिसेनजी, नगर सेवक मेघश्याम जमकातन, नीलकमलताई मोहूर्ले, ज्योतिताई नैताम, सुगना काटेंगे, रामकुमार नायक, सुरेश काटेंगे, कमल खंडेलवाल, सरपंच ताई कोटरा, राहुल मलगाम, अनिल वाढई, आसाराम शेन्डे सह संपूर्ण भाजपा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.