शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार,पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी फरार

चंद्रपूर जिल्हा महत्वाची बातमी महाराष्ट्र
Unique Multiservice
Share

सावरगाव : – तळोधी बा.पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील एका शाळेत शिक्षकी व्यवसाय करणारे नागभीड येथील रविन्द्र पांडुरंग नन्नावरे Ravindra Pandurang Nannaware वय ५६ वर्षे यां नराधम शिक्षकाने काल दुपारच्या ४वाजता खेळण्यासाठी सुट्टी दरम्यान अल्पवयीन १०वर्ष मुलीससबोत छेडछाड करणाऱ्या शिक्षकांवर पालकांच्या तक्रारीवरून तळोधी बा.पोलीस येथे अपराध क्र.३००/२०२३ कलम ३५४ अ भांदवी सहकलम ८,१० पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.तळोधी बा.पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी म्हणून तळोधी बा.पोलीस स्टेशन चे पी.एस.आय.भाष्कर पिसे तपास करीत आहे.सदर आरोपीचा तपास केला असता आरोपी फरार असून पोलीसांकडून शोध मोहीम सुरू असून लवकरच आरोपीचा शोध घेतला जाईल असे म्हटले जाते.तसेच त्या नराधम शिक्षकांवर ताबडतोब शिक्षण विभागाने निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत