Chandrapur-batmi

वसतिगृहातील विद्यार्थिनीचा झोपेतच मृत्यू

चंद्रपूर जिल्हा महत्वाची बातमी
Unique Multiservice
Share

विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालया वांढरी चंद्रपूर येथील वसतिगृहात बीएएमएसच्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थिनीचा गुरुवारी मृत्यू झाला. Girl dead found in hostel.

मृत विद्यार्थिनीचे नाव अचल प्रमोद गोरे  Achal Pramod Gore 23, असुन जगन्नाथ बाबा मंदिर, यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील आहे. आचल ही विमलादेवी मेडिकल कॉलेज बीएएमएसच्या चौथ्या वर्षाची विद्यार्थिनीआहे. 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ती तिच्या मैत्रिणींसोबत जेवण करून झोपायला गेली. गुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता तिच्या रूममेटने तिला उठवले परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिने वॉर्ड बॉय साहिल दसोडे याला मदतीसाठी बोलावले. त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रूग्णालय चंद्रपूरच्या इमर्जन्सी वॉर्डात नेले असता डॉ.अमर ताडे यांनी तिला मृत घोषित केले. पडोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत