राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनी करीता शिन्दे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूल च्या मॉडेलची निवड कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई अतंर्गत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय चंद्रपूर द्वारा आयोजित जिल्हा स्तरीय तंत्र प्रदर्शन शासकीय औद्यागीक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे २० डिसेंबरला पार पडली. यात 78 प्रतिकृती (मॉडेल) सहभागी होते , प्रदर्शनी चे उद्घाटन एम.आय.डी.सी. चंद्रपूर चे अध्यक्ष मधुसुदन रूगंठा याच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारण मंडळ चंद्रपूर चे अध्यक्ष पी.बी आंबटकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रवीन्द्र मेहेंदळे व शासकीय व खाजगी प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उपस्थित होते. औद्योगीक जिल्हास्तरीय तंय प्रदर्शनी मध्ये शासकीय व खाजगी प्रशिक्षण संस्थानी सहभाग घेतला. अभियांत्रिकी, बिगर अभियांत्रिकी व इन्होव्हेटीव्ह अशा एकुन 78 प्रतिकृती सहभागी होत्या त्यापैकी राज्यस्तरीय प्रदर्शनाकरीता १० मॉडेल ची निवळ करण्यात आली त्यात शिन्दे आय.टी.आय गुल या संस्थेतील शेतकरी मित्र (मळणी यंत्र) अभियांत्रिकी गटात मॉडेलची निवळ झाली या यशस्वीते करीता फिटर विभागाचे निदेशक अमोल वाळके व प्रशिक्षणार्थी यांनी बनविलेल्या मळणी यंत्र करीता प्राचार्य श्री. पद्माकर नारनवरे सर, श्री. अनिकेत बुग्गावार सर, याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. राज्यस्तरावर निवळ झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक मा. डॉ. अनिलजी शिंदे साहेब यांनी प्राचार्य व निदेशकांचे अभिनंदन करून राज्यस्तरावर जाण्यासाठी शुभेच्छा प्रदान केल्या.