श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
स्थानिक गुन्हे शाखेने चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या
गडचिरोली
जिल्हा अतिदुर्गम व माओवाद प्रभावित असल्याने संपुर्ण देशात मोठ¬ा प्रमाणात मोबाईलचा वापर होत असतांना देखील या परिसरात पर्याप्त संख्येने मोबाईल टॉवर नसल्याने येथील निम्म्यापेक्षा जास्त जनता या सुविधेपासुन वंचित होती. भारत सरकारने सदर बाबीस प्राधान्य देवुन मोबाईल सेवा पुरविणाया विविध कंपन्यांच्या मदतीने मागील काही वर्षात ठिकठिकाणी मोबाईल टॉवर उभारुन येथील जनतेस नेटवर्क उपलब्ध करुन दिल्याने आज घडीस गडचिरोली जिल्ह्रातील काना-कोपयात मोबाईलचा वापर सुरु झाल्याचे दिसुन येते. संबंधित मोबाईल कंपन्यांचे मोबाईल टॉवर हे अतिदुर्गम व जंगल परिसरात असल्याने तेथे फारसा कोणाचा वावर नसल्याने त्या मोबाईल टॉवरवरील बॅटया व किंमती मशिनरीज यांच्या चोरींचे प्रमाण अलीकडच्या काळात मोठ¬ा प्रमाणात वाढले असुन ते टॉवर पुर्ववत करण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत असल्याने सामान्य जनतेस नाहक त्रास सहन लागत असुन कंपण्यांना मोठ¬ा प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
अशा चोरींचे वाढते प्रमाण लक्षात येताच पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सदर चोया उघडकीस आणण्याबाबत निर्देशीत केले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांचे दोन स्वतंत्र पथक तयार करुन आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आरोपींचा शोध घेत असतांना असे निदर्शनास आले की, मोबाईल टॉवरमधील बॅटरी चोरी करणारी व किंमती मशीनरीजची चोरी करणारे दोन वेगवेगळ्या व्यक्ती कार्यरत असुन त्या मोबाईल कंपनीमध्येच नोकरीस असुन अथवा तेथील नोकरी सोडुन या प्रकारच्या चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले.
सदर माहितीची शहानिशा करुन स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन मोबाईल टॉवरमधील किंमती मशीनरीज चोरी करणारे (1) उमेश दिलीप मेश्राम, वय 30 वर्ष, रा. पांढरकवडा, ता. जिल्हा चंद्रपूर सध्याचा पत्ता आशीर्वाद नगर, गडचिरोली यांस गडचिरोली येथुन व चोरीचा माल घेणारे (2) वसीम अखतर अब्दुल नजीर, वर्षे 39 वर्ष, रा. हॉस्पीटल वार्ड, जेटपुरा गेट, चंद्रपुर यांस चंद्रपुर येथुन काल दि. 07/11/2024 रोजी ताब्यात घेवुन 2,87,000 हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. तसेच मोबाईल टॉवरमधील बॅटरी चोरी करणारे (3) मंगेश नथ्थुजी निकोडे, वय 31 वर्षे, रा. चिरोली ता. मुल जि. चंद्रपुर यांस मुल येथुन व (4) प्रफुल मनोहर लोनबले, वय 24 वर्ष, रा. जेप्रा ता. जि. गडचिरोली यांस जेप्रा येथुन आज दि. 08/11/2024 रोजी ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्ह्रासंबंधाने विचारपुस केली असता, आरोपी क्रमांक 1 याने, मौजा वैरागड, गडचिरोली, कोनसरी, धानोरा, चामोर्शी, डोंगरसावंगी, गडचिरोली कॉम्प्लेक्स परिसरातील मोबाईल टॉवरमधील मशीनरीज तर आरोपी क्रमांक 3 व 4 याने मौजा विक्रमपुर व अनकोडा येथील मोबाईल टॉवरमधील बॅटया चोरले असल्याची कबुली दिली. नमुद आरोपींना पुढील कायदेशीर कारवाई करण्याकामी पोलीस स्टेशन आष्टी यांच्या ताब्यात देण्यात आले. News Jagar
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुलत व राहुल आव्हाड, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार सतीश कत्तीवार, अकबर पोयाम, पोलीस अंमलदार श्रीकांत बोईना, श्रीकृष्णा परचाके, नामदेव भटारकर, प्रशांत गरफडे, शिवप्रसाद करमे, राजु पंचफुलीवार, दिपक लेनगुरे, संदिप मेश्राम यांनी केली.