नागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखे ने मंगळवारी एकास अटक करून त्याच्या घरातून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत राऊंड, एक तलवार आणि चाकू जप्त केला.
विश्वास नगर, राजाराम डेअरीजवळ, गिट्टीखदान येथील रहिवासी आकाश राजू हतागडे (३६) aakash raju hatagade यास क्राइम ब्रँचच्या युनिट १ ने बंदुक आणि धारदार शस्त्रे असल्याची माहिती वरून त्यास अटक करण्यात आले माहितीच्या आधारे युनिट-1 च्या पथकाने पीआय सुहास चौधरी suhas chaudhari , एपीआय सचिन भोंडे sachin bhonde आणि हवालदार कर्मचारी हतागडे यांनी आकाश राजू हतागडे याच्या घरावर छापा टाकून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत राऊंड, एक तलवार आणि चाकू असा एकूण 25,700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदर इसमावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल के;या असून अधिक तपास सुरु आहे