!स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षापासून आजही एकनसुर ,सूरगाव गावात जाणारे रस्त्याचे काम झाले नाही!
!मूलभूत सोयी सुविधा पासून वंचित ,सूरगाव, एकनसुर गावाचा राज्य सरकारने विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा!
!राज्य शासनाने मानवी हक्काचा उलंघन करू नये! –
दिनांक 28 नोव्हेंबर 2024 गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावात जाणाऱ्या रस्त्यावर आजही साधे खडीकरण रस्ते होऊ शकले नाही आजही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षापासून अनेक गाव विविध मूलभूत सोयी सुविधा पासून वंचित आहेत, राज्य शासनाने अश्या मूलभूत सुविधा पासून वंचित असणाऱ्या या समस्त गावांचा पायाभूत विकास करावा व शेवटच्या अतिसंवेदनशील जंगलव्याप्त गावांचा दर्जा सुधारावा ,तसेच अश्या गावांना भारतीय घटनादत्त अधिकार अधिनियम लागू करुन समस्त सोयी सुविधा उपलब्ध करुन द्यावे व भारतीय कायद्यानुसार या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी राष्ट्रिय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी केली
आज जिल्ह्यातील अति संवेदनशील व जंगलव्याप्त एकनसुर आणि सुरगाव येथील रहिवासी नागरिकांनी आपल्या समस्या सांगण्यासाठी डॉ प्रनय भाऊ खुणे यांना आमंत्रित केले व डॉ प्रणय भाऊ खुणे यांनी या गावात सदिच्छा भेट दिली व गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतले व सविस्तर चर्चा केले आणि त्या समस्त नागरिकांसोबत संवाद साधला आणि विविध मूलभूत सोयी सुविधा विषयावर चर्चा केली यावेळी या गावातील नागरिकांनी स्वातंत्र्याच्या वर्षापासून प्रामुख्याने प्रलंबित असलेल्या या रस्त्याबाबत चर्चा केली व त्यांनी खंत व्यक्त केला आणि सांगितले किमान आमच्या या अतिशय जंगलव्याप्त आणि अतिसंवेदनशील असणाऱ्या या गावांमध्ये आम्हाला किमान मूलभूत सोयी सुविधा तरी राज्य शासनाने करून द्यावे गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास काम होत आहे गडचिरोली जिल्हा स्टील हब होतोय म्हणून खूप मोठा गाजावाजा करण्यात येत आहे तिथे रोजगार येत आहे असे गाजावाजा होत आहे परंतु ज्या ठिकाणी लोह उत्खनन होत आहे तेथून जवळच असलेल्या सूर्जागड पहाडीपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एकनसुर आणि सुरगाव येथील तसेच अनेक दुर्गम गावे विविध सोयी सुविधा पासून वंचित अतिशय विदारक चित्र आहे. राज्य शासनाचे अनेक विकास कामे व योजना या गावात आजही पोहोचले नाही हे वास्तविक विदारक चित्र या गावांमध्ये आहे त्यामुळे आजही या गावांचा विकास झाला नाही व या गावांचा सर्वांगीण विकास होणे काळाची गरज आहे व राज्य सरकारने मानवाधिकाराचा उल्लंघन करू नये,अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जावू असा इशारा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी दिले यावेळी सूरगाव व एकनसुर येथील रहिवासी नागरिकांसोबत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाअध्यक्ष रमेश अधिकारी व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते