श्री. नंदकिशोर वैरागडे , विशेष जिल्हा प्रतिनिधी,गडचिरोली जिल्हा
तालुका कृषी कार्यालय, कोरची यांचेकडुन. मा.श्री. कृष्णाजी गजबे, आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र यांचे हस्ते राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना अंतर्गत निजीयाबाई इुर्गाराम देवांगण , कोचिनारा यांना ट्रक्टरचे वितरण करण्यात आले
गट साधन केंद्र, पंचायत समिती, कोरची यांचेकडून समावेशी क शिक्षा दिव्यांग विद्यार्थी योजना अंतर्गत कु.दुष्यंत पुरुषोत्तम सहळा, रा. कोचीनारा या दीव्यांग विद्यार्थ्याला tricycle चे वाटप करण्यात आले.
दि गडचिरोली डिस्ट्रीक्ट सेंट्रल को- ऑप्. बँक, कोरची यांचे कडुन समृध्दी स्वयं सहायता समुह भुऱ्यालदंड यांना रु.1,00,000/- कर्ज देण्यात आले.
उमेद कडुन शाश्वत उपजिवीका निर्माण करणेकरीता रु.50,000/- चे धनादेश बेडगाव येथिल महिला बचत गटाला वाटप करण्यात आले.
तसेच मोहगाव येथिल बचत गटांना रु.70,000/- , भिमपुर येथिल 2 बचत गटांना रु.20,000/- व रु 60,000/- CIF निधीचे वाटप करण्यात आले
महाराष्ट्र ग्रामिण जिवनज्योती अभियान उमेद पंचायत समिती कोरची कडुन व्यवयायाकरीता रु 1,50,000/- चे कर्ज गौरी स्वयं सहायता समुह , मोहगाव व संजना स्वयं सहायता समुह, कोसमी यांना रु.1,50,000/- यांना विदर्भ ग्रामिण बँक कोरची कडुन मंजुर करुन चेक वाटप करण्यात आले.तसेच बँक ऑफ इंडीया, कोरची कडुन , जय सेवा समुह , बोडेना यांना रु. 1,00,000/- , लक्ष्मी महिला समुह , गुटेकसा यांना रु.2,00,000/- , शक्ती समुह भिमपुर यांना रु.2,50,000/- , सरस्वती समुह, काळे यांना रु.50,000/- , भिमज्योत समुह, बेलगाव घाट यांना रु.3,00,000/- व महालक्ष्मी समुह , जांभळी यांना रु.2,00,000/- चे धनादेश वितरण करण्यात आले.
* प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत एक गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.
* एकात्मिक बाल विकास कार्यालयकडून ४ महिला लाभार्थ्यांना बेबी किटचे वितरण, करण्यात आले * तहसील कार्यालय कडून जातीचे प्रमाणपत्र- 27, उत्पन्न प्रमाणपत्र -38 अधिवास प्रमाणपत्र- 15 , राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत रू.20,000/- चे चार महिला लाभार्थींना लाभ देण्यात आले.
* पुरवठा विभागाकडून 6 लाभार्थ्यांना दुय्यम शिधापत्रिका वाटप करण्यत आले.
आरोग्य विभागाकडून सिकलसेल, शुगर, रक्त तपासणी व इतर विविध प्रकारच्या 350 तपासण्या तसेच 187 गोल्डन कार्ड, 69 सिकलसेल कार्ड, 57 लाभार्थ्यांची डोळे तपासणी, 157 NCD तपासणी, प्रसूत माताJSY- 10 लाभ देण्यात आले
* सेतू केंद्राकडून -32 आधार नवीन कार्ड ची नोंदणी करण्यात आली. *म.ग्रा.रो.ह.यो अंतर्गत 27 जॉबकार्ड,
* चार ग्रामपंचायत कडून विविध प्रकारचे दाखले- 65 वितरित कारण आले.
* महिला व बालकल्याण विभागाकडून 5 लाभार्थ्यांना बेबी केअर किट वाटप करण्यात आले.
* महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ,उमेद यांचे कडून 5 लाभार्थ्यांना शिधा किट व ब्लँकेट वितरित करण्यात आले.
* पंचायत समिती, कोरची कडून 7 लाभार्थी ना शबरी आवास योजने अंतर्गत तसेच 2 लाभार्थी ना मोदी आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले.